शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Aditya Thackeray: आदित्य ठाकरे, अनिल परब यांच्या निकटवर्तीयांवर प्राप्तिकरचे छापे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 06:57 IST

मुंबई आणि पुण्यातील १५ विविध ठिकाणी झाली कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यासह त्यांचे निकटवर्तीय पालिकेचे कंत्राटदार, अशा तब्बल ३५ हून अधिक ठिकाणी छापे टाकल्यानंतर आता प्राप्तिकर विभागाने पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि परिवहनमंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित व्यक्तीकडे मोर्चा वळवला आहे. मंगळवारी सकाळपासून मुंबई आणि पुणे येथे १५  ठिकाणी छापे टाकण्यात आले. 

 युवासेनेचे पदाधिकारी, तसेच शिर्डी संस्थानचे विश्वस्त असलेले उद्योजक राहुल कनाल यांच्या वांद्रे येथील नाइन अल्मेडा इमारतीतील निवासस्थानी प्राप्तिकर विभागाकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. कनाल हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आहेत. यावेळी कनाल यांच्या इमारतीखाली केंद्रीय राखीव दलाच्या जवानांचा बंदोबस्त तैनात होता. 

दुसरीकडे, अनिल परब यांचे निकटवर्तीय समजले जाणारे आणि शिवसेनेच्या अंधेरी पश्चिम मतदारसंघाचे संघटक संजय कदम यांच्या निवासस्थानीही प्राप्तिकरने छापे टाकले. कदम हे केबल व्यावसायिक असून, ते अंधेरीतील कैलास नगरमध्ये असलेल्या ‘स्वान लेक’ या इमारतीतील १६ व्या मजल्यावर राहतात. पुण्यातील प्रादेशिक परिवहन विभागाचे (आरटीओ) अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या घरावरही प्राप्तिकर विभागाच्या पथकाने मंगळवारी छापा टाकला.  या कारवाईदरम्यान, महत्त्वपूर्ण दस्तावेज प्राप्तिकर विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहेत, तसेच संबंधितांच्या विविध मालमत्तांवरदेखील सर्च ऑपरेशन सुरू आहे.

आधी यशवंत जाधव यांच्या घरीही छापेमारीn यापूर्वी प्राप्तिकर विभागाने यशवंत जाधव आणि त्यांच्याशी संबंधित निकटवर्तीयांच्या निवासस्थानी छापेमारी केली. n या कारवाईतून तब्बल १३० कोटी रुपये किमतीच्या ३६ स्थावर मालमत्तांचे तपशील आणि पालिका कंत्राटदारांनी तब्बल २०० कोटींचे उत्पन्न लपविल्याची माहिती समोर आली आहे. 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेIncome Taxइन्कम टॅक्सAnil Parabअनिल परब