शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुकीवर आयकर विभागाचा वॉच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 04:42 IST

४२ मतदारसंघांसाठी पुण्यात कंट्रोल रूम; पाच मतदारसंघांसाठी ५५ अधिकारी

ठाणे : लोकसभा निवडणुकीवर आता आयकर विभागाची करडी नजर असणार आहे. विशेषकरून काळ्या पैशांवर नजर ठेवण्यासाठी विशेष शीघ्रकृती पथकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. ही पथके निवडणुकीच्या काळात २४ तास कार्यरत असणार असल्याचे आयकर विभागाने स्पष्ट केले आहे.निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात काळा पैसा बाहेर पडत असतो. त्यावर जरब बसविण्यासाठी आयकर विभाग २४ तास कार्यरत असणार आहे. यासाठी ठाणे आयकर विभागाने ५५ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पुण्याला विशेष कंट्रोल रूमची स्थापना करण्यात आली आहे. त्याअंतर्गत ४२ लोकसभा क्षेत्रांचा समावेश असणार आहे. यात ठाणे आयकर विभागाचे संयुक्त निर्देशक (अन्वेषण) अभिषेक सिंग यांच्यावर पाच मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याअंतर्गत पालघर, कल्याण, ठाणे, भिवंडी, रायगड या मतदारसंघांचा समावेश असणार आहे. प्रत्येक मतदारसंघात एक उपायुक्त, दोन आयकर अधिकारी, तीन निरीक्षक असे पथक असणार आहे. हे पथक पैसा, सोने, दारू आदींच्या वाटपावर लक्ष ठेवणार आहे.यासाठी १८००२३३०७०० आणि १८००२३३०७०१ हे टोल फ्री क्र मांक कार्यरत असणार आहेत. शिवाय, ७४९८९७७८९८ हा व्हॉट्सअ‍ॅपचा क्र मांक असणार आहे. तक्रारदाराने एखाद्या ठिकाणी गैरप्रकार सुरू असल्यास त्याची माहिती देताच कंट्रोल रूममधून तत्काळ स्थानिक शीघ्रकृती पथकाला त्याची माहिती दिली जाणार आहे.त्यानुसार, या तक्रारीची पडताळणी करून अवघ्या अर्ध्या तासात हे पथक संबंधित ठिकाणी पोहोचणार आहे. महत्त्वाचे म्हणजे याकरिता स्थानिक पोलीस अधीक्षक आणि उपायुक्त यांच्याशी संपर्कसाधण्यात येणार असल्याचे ठाणे आयकर विभागाचे संयुक्त निर्देशक (अन्वेषण) अभिषेक सिंग यांनी सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकIncome Taxइन्कम टॅक्स