शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

जैन उद्योग समुहाच्या तीन कंपन्यांसह देशभरातील आस्थापनांची प्राप्तीकर विभागाकडून तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 02:43 IST

डॉक्टर, सीए, लेखापालकडे तपासणी

जळगाव : जैन उद्योग समुहाच्या जळगाव येथील तीनही कंपन्यांसह देशभरातील आस्थापनांची प्राप्तीकर विभागाच्या पथकाने गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास एकाच वेळी तपासणी सुरु केली. या पथकात १०० ते १५० जणांचा समावेश आहे. पथकाने समुहाशी संबंधित असलेले सीए, अकाउंटंट, डॉक्टर, सहकारी बँक, व्यावसायिक अशा २६ ठिकाणी एकाचवेळी तपासणी सुरू केली. रात्रीपर्यंत ही तपासणी सुरूच होती.जैन समुहाच्या दालनांसह निवासस्थानीदेखील पथकाने तपासणी केली. या खेरीज एका सुवर्ण पेढीचीही चौकशी करण्यात आल्याची माहिती मिळाली. जैन उद्योग समुहाने जळगावात सुरुवात करून देश-विदेशात आपला विस्तार केला. कंपनीतील तपासणीबाबत नेमके कारण समजले नसले तरी गेल्या वर्षापासून कंपनी नुकसान सहन करीत असल्याचे कारण दाखवित नुकत्याच समाप्त झालेल्या तिमाही अहवालातही तोटा झाल्याचे कंपनीने नमूद केले. त्यात कराविषयीदेखील संशय आल्याने प्राप्तीकर विभागाने कंपनीसह त्यांच्याशी संबंधित आस्थापना, सीए, अकाउंटंट, डॉक्टर, बँक, ट्रॅक्टर दालन यांच्यावर लक्ष केंद्रीत केले. त्यानंतर गुरुवार, २७ रोजी थेट प्राप्तीकर विभागाचे पथक जळगावात दाखल झाले.एकाच वेळी छापागुरुवारी दुपारी जैन उद्योग समुहाच्या जळगावातील बांभोरी येथील जैन पाईप, शिरसोली रस्त्यावरील जैन हिल्स, फूड पार्क यासहदेशभरातील समुहाच्या सर्वच कार्यालयांची तपासणी सुरु करण्यात आली. दुपारी कंपनीत पथक पोहचल्यानंतर त्या ठिकाणी विविध खाते, संगणक, वेगवेगळे रेकॉर्ड, होणारा पुरवठा याची तपासणी झाली. या पथकात नागपूर, नाशिक, औरंगाबाद, पुणे, अकोला येथील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.समुहाशी संबंधित आस्थापना, व्यक्तींकडेही तपासणीजैन उद्योग समुहाशी संबंधित असलेले तीन ते चार सीए, अकाउंटंट यांच्याकडेही पथकाने तपासणी केली. याशिवाय शिवाजीनगरातील एका ट्रॅक्टर दालनामध्येही चार ते पाच जणांचे पथक पोहचले होते. तेथेदेखील कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.या तपासणीबाबत दुपारी सर्वत्र चर्चा सुरू झाली. मात्र प्रत्यक्ष अधिकारी, कंपनीसह तपासणी झालेल्या सर्वच ठिकाणी कमालीची गुप्तता पाळण्यात येत होती. या तपासणीबाबत जैन उद्योग समुहाशी वारंवार संपर्क साधूनही प्रतिसाद मिळाला नाही.

टॅग्स :Income Tax Officeमुख्य आयकर आयुक्त कार्यालय