शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

एसटी महामंडळाच्या कॉल सेंटरचे उद्घाटन, टोल फ्री क्रमांक १८०० २२ १२५०

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 16:12 IST

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बहुचर्चित टोल फ्री कॉल सेंटर सुविधा दिमाखात सुरू झाली.

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बहुचर्चित टोल फ्री कॉल सेंटर सुविधा दिमाखात सुरू झाली. राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत लोकमत समूहाचे समूह संपादक दिनकर रायकर यांच्या हस्ते कॉल सेंटरचे उद्घाटन झाले. मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयात गुरुवारी उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी व्यवस्थापकीय संचालक आणि एसटी उपाध्यक्ष रणजित सिंह देओल उपस्थित होते.राज्यातील खेडोपाडी एसटी सेवा कार्यरत आहे. राज्यातील एसटी सेवांचे नियमन आणि वेळापत्रक यांची चौकशीबाबत माहिती प्रवाशांना मिळेल. त्याचबरोबर प्रवाशांच्या तक्रारीचे निवारण देखील कॉल सेंटरच्या मार्फत करण्यात येणार आहे. एसटीमध्ये योग्य बदल घडवण्यासाठी प्रवाशांच्या सूचना देखी कॉल सेंटरच्या माध्यमाने स्वीकारण्यात येणार आहे.एसटी प्रशासनाच्या कॉल सेंटरला लोकमत समूहाचे समूह संपादक यांनी पहिला फोन केला. यावेळी कॉल सेंटर प्रतिनिधीला रायकर सरांनी अभिनंदन केले. त्याच बरोबर ही सेवा अधिकाधिक चांगली आणि अविरत कशी सुरू राहील, याबाबत सूचना केल्या.

प्रशासन गतिमान  होणार कॉल सेंटरमुळे एसटी प्रशासन गतिमान होणार आहे . एका वेळी एका मिनिटात 120 कस्टमर कॉल अटेंड करण्यात येणार आहे, तक्रारदारचे म्हणणे संबंधित विभागाकडून सोडवण्यासाठी कॉल सेंटरचा मुख्य हेतू असणार आहे. कर्मचा-यांनी देखील आपल्या अधिकारांच्या बाबतीत तक्रारी येथे स्वीकारण्यात येणार आहे. यामुळे प्रशासन आणि तक्रारदार यांच्यातील दुरावा मिटणार असून एसटी प्रशासनाला अधिक गतिमान करण्यास वाव मिळणार आहे.- दिवाकर रावते, परिवहन मंत्री आणि एसटी अध्यक्ष

टॅग्स :ST Strikeएसटी संप