शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

अधिवेशनात सरकारने मूळ प्रश्नांपासून काढला पळ, विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 11:09 IST

या पत्रकार परिषदेला विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संबोधित केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधी मात्र यावेळी गैरहजर होते.   

मुंबई : अधिवेशन सरकारने रेटून नेण्याचा प्रयत्न केला. पण मूळ प्रश्नांपासून सरकारने पळ काढला. हे सरकार व्यक्तिगत हितासाठी काम करते आहे, अशी टीका विरोधी पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली. या पत्रकार परिषदेला विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संबोधित केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधी मात्र यावेळी गैरहजर होते.

राज्यात काही भागांत अतिवृष्टी, काही भागांत दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पण शासनाने त्यांना काहीच मदत जाहीर केलेली नाही. हे फक्त घोषणाबाज सरकार आहे. 

ट्रीपल इंजिन सरकार म्हणतात, दोन इंजिन असले की गाडी सरळ चालते. मात्र, इंजिन कोणत्या दिशेला जाते कळत नाही, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.  

९० मतदारसंघात निधी का नाही?राज्यात २८८ पैकी ९० मतदारसंघात सरकारने कोणताही विकासनिधी दिलेला नाही. या मतदारसंघातील जनताही कर भरते, त्यामुळे त्यांचा विकासाचा अधिकार आहे, पण तो दाबण्याचा प्रयत्न सरकारने केल्याची टीकाही यावेळी विरोधकांनी केली. 

श्वेतपत्रिका नाही, काळी पत्रिका : दानवे वेदांत-फॉक्सकॉनबरोबर अनेक बैठका होऊन करारनाम्याचा मसुदा तयार झाला होता. टाटा एअर बसचा प्रकल्पही महाराष्ट्रात होण्यासाठी प्रयत्न केला. स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांनी हे प्रकल्प राज्यात होणार, असे जाहीर केले होते. हे प्रकल्प जाणीवपूर्वक निवडणुकीच्या काळात गुजरातला नेण्यात आले.  त्यांनी श्वेतपत्रिका नाही, तर काळी पत्रिका मांडली, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाAmbadas Danweyअंबादास दानवे