शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

नव्या वर्षात भर जबाबदार पर्यटनावर; पर्यावरण संतुलन, रोजगार, शाश्वत विकासाचे धोरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 08:49 IST

जबाबदार पर्यटनाची अंमलबजावणी करत असताना पर्यटन विभागाने राज्यातील एमटीडीसीच्या सर्व रिसॉर्टमध्ये कृत्रिम खाद्यरंगांच्या वापराला प्रतिबंध केला आहे.

मुंबई : राज्य शासनाच्या पर्यटन विभागाने नव्या वर्षात जबाबदार पर्यटनाच्या धोरणावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले आहे. या माध्यमातून पर्यटकांनी केवळ पर्यटन न करता त्यासोबतच पर्यावरण संतुलन, रोजगार संधी, स्थानिक कला व कलाकारांना प्रोत्साहन आणि स्थानिक अर्थकारणाचे बळकटीकरण करावे, या उद्देशाने काम करण्यात येणार आहे. 

जबाबदार पर्यटनाची अंमलबजावणी करत असताना पर्यटन विभागाने राज्यातील एमटीडीसीच्या सर्व रिसॉर्टमध्ये कृत्रिम खाद्यरंगांच्या वापराला प्रतिबंध केला आहे.  त्याचप्रमाणे, राज्यभरात पर्यटन विभागाच्या कार्यालयात वा रिसॉर्टमध्ये सिंगल युज प्लास्टिक प्रतिबंधित असून शिवाय, खाद्यपदार्थ पॅकिंग करण्यासाठीही केवळ बायोडिग्रेडेबल पॅकेजेसचा वापर करण्यात येतो.

तसेच, राज्यभरातील पर्यटन विभागाच्या रिसोर्टमध्ये कचऱ्याचे वर्गीकरण, जल संधारण, जैवविविधतेचे संवर्धन आणि वृक्षारोपण केले जाते. याखेरीस, विशेष म्हणजे दिव्यांग वा मनोरुग्णांसाठी विशेष पर्यटन टूरचे आयोजनही केले जाते, अशी माहिती पर्यटन विकास महामंडळाचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांनी दिली.

स्थानिक अर्थकारणाला प्राधान्यजबाबदार पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळावा, या हेतूने पर्यटन विभागाकडून आदरातिथ्याचे प्रशिक्षण देण्यात येते. तसेच, स्थानिक कला-खाद्य संस्कृतीलाही प्रोत्साहन देऊन त्यांच्या उत्पादनांना व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न व्यापक स्वरूपात करण्यात येणार आहे. ही संकल्पना पर्यावरणीय शाश्वतता, जैवविविधतेचे संरक्षण, आर्थिक शाश्वतता, सामाजिक-सांस्कृतिक शाश्वततेला चालना, पर्यटन प्रमाणीकरणासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वासही अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

विकासाच्या सकारात्मकतेच्या दिशेने पाऊलपर्यटन आणि पर्यावरण यांचा विशेष संबंध आहे. त्यांचा एकमेकांशी संवाद ही दुहेरी प्रक्रिया आहे. एकीकडे पर्यावरण संसाधने पर्यटनाच्या मूलभूत घटकांपैकी एक आहेत. नैसर्गिक आणि मानवनिर्मित  पर्यटन स्थळे एक प्रकारे पर्यटन संधी तयार करतात.  पर्यटक, आयोजक समुदाय आणि स्थानिक वातावरण यांच्यातील जवळचे आणि थेट संबंध एक संवेदनशील परिस्थिती निर्माण करतात. ज्यायोगे पर्यटन शाश्वत विकासासाठी खूप सकारात्मकदेखील असू शकते. याअनुषंगाने पर्यटन क्षेत्रातील विविध भागधारकांमधील लवचिकता, टिकाऊपणा आणि परस्परसंबंध यावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. यामुळे पर्यावरणीय, सामाजिक-सांस्कृतिक आणि आर्थिक शाश्वतता यासह शाश्वत पर्यटनाच्या तत्त्वांचा अवलंब करण्यास निश्चितच प्रोत्साहन मिळेल.-श्रद्धा जोशी, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ

टॅग्स :tourismपर्यटन