शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणात कोणी कायमचा शत्रू-मित्र नसतो! अजित पवार बोलून गेले, दुसऱ्याच क्षणी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 08:03 IST

उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विधान अन् सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या

मुंबई : राजकारणात कोणी कायमचे शत्रू वा मित्र नसते, असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आणि पत्रकारांच्या भुवया उंचावल्या. मात्र, आपल्या या विधानाचा वेगळा काही अर्थ काढू नका, असे पवार यांनी स्वत:च स्पष्ट केले.विधिमंडळ अधिवेशनाची सांगता झाल्यानंतर ते पत्रपरिषदेत बोलत होते. त्यानी ईडी वापरली तर तुम्ही पोलीस वापरायचे हे योग्य वाटते काय, या प्रश्नावर पवार म्हणाले की, कोणतेही सरकार लोकशाही पद्धतीने निवडून आलेले असते. सत्तापक्ष आणि विरोधक  दोघांनी एकमेकांचा सन्मान ठेवला पाहिजे.  कोणी कोणाचे कायमचे शत्रू वा मित्र नसतो असे सांगताना त्यांनी, १९९५ पासून राज्यात बदलत गेलेल्या राजकीय जोड्यांचा संदर्भ दिला. नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्यावर कारवाई झाली. सूडभावनेने अशा कारवाया करण्याची राज्याची परंपरा नाही. हा यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे, असेही ते म्हणाले.विधानसभाध्यक्ष निवड राज्यपालांच्या अनुमतीनेच विधानसभा अध्यक्षांची निवड या अधिवेशनातही होवू शकली नाही. पुढील अधिवेशनात तरी ती होणार का, या प्रश्नात त्यांनी राज्यपालांच्या अनुमतीशिवाय ही निवड केली जाणार नाही, असे स्पष्ट केले. या परवानगीशिवाय निवड करायची असा विचार आमच्यात झाला होता पण शेवटी राज्यपालांच्या परवानगीशिवाय निवड करायची नाही, असे ठरल्याचे अजित पवार म्हणाले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार