शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
5
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
6
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
7
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
8
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
9
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
11
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
12
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
13
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
14
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
15
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
16
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
17
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
18
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
19
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
20
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

महाराष्ट्रात 172 मेंदूमृतांनी दिले 457 रुग्णांना जीवदान; अवयवदानात पुणे विभाग अव्वल, छ. संभाजीनगर मागे

By संतोष आंधळे | Updated: January 2, 2025 13:48 IST

राज्यात यावर्षी पुणे विभागातून सर्वाधिक ७० मेंदूमृत अवयवदान झाले आहे.  गेल्यावर्षीच्या तुलनेत अवयवदानाचा  आकडा वाढला असला, तरी मेंदूमृत अवयवदानासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 

संतोष आंधळे -मुंबई : गेल्या काही वर्षांत अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणात यशस्वी होत आहेत. त्यामुळे अवयव निकामी असणाऱ्या रुग्णांमध्ये आशेची नवीन उमेद निर्माण झाली आहे. त्यामुळे अवयवांसाठी प्रतीक्षेत असणाऱ्या रुग्णांची प्रतीक्षा यादी वर्षागणिक मोठी होत आहे.  यावर्षी २०२४ मध्ये राज्यात १७२ मेंदूमृत अवयवदात्यांनी अवयवदान केल्यामुळे ४५७ रुग्णांना जीवदान मिळाले आहे.  राज्यात यावर्षी पुणे विभागातून सर्वाधिक ७० मेंदूमृत अवयवदान झाले आहे.  गेल्यावर्षीच्या तुलनेत अवयवदानाचा  आकडा वाढला असला, तरी मेंदूमृत अवयवदानासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. मुंबई, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या चार विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समित्यांकडून मेंदूमृताकडून मिळणाऱ्या अवयवाच्या नियमनाचे काम करण्यात येते.  त्यांच्याकडे त्यांच्या विभागातून अवयवांसाठी प्रतीक्षेत असणाऱ्या रुग्णांची नोंदणी केलेली असते. त्यानुसार अवयव प्राप्त झाल्यानंतर त्या क्रमवारीने अवयवांचे वाटप करण्यात येते. तसेच राज्यात राज्य अवयव आणि उती पेशी प्रत्यारोपण संस्था या सर्वांच्या कामावर देखरेख करण्याचे काम करत असते. सन २०२३ मध्ये राज्यात १४९ जणांचे अवयवदान झाले होते. मात्र, २०२४ मध्ये वाढ झाली. यंदा १७२ जणांचे अवयवदान केले. यावेळी हा आकडा २३ने वाढला आहे.   

सरकारी रुग्णालयात अनास्था राज्यातील बहुतांश मेंदूमृत अवयवदान हे खासगी रुग्णालयांतून होते. मात्र, फारच कमी प्रमाणात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील रुग्णालयांत होत असते. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, सार्वजनिक रुग्णालयांत मोठ्या प्रमाणात मेंदूमृत रुग्ण असतात. मात्र, या रुग्णालयांत पुरेसे वैद्यकीय बळ नसल्यामुळे अनेकवेळा अवयवदान होत नाही. तसेच काही विशिष्ट रुग्णालये सोडली तर सरकारी रुग्णालयांत अवयवदान व्हावे, यासाठी फारसे प्रयत्न केले जात नाहीत.   

यंदा राज्यात अवयवदानाचा आकडा वाढला असला, तरी अजूनही मोठ्या प्रमाणात अवयवदान होण्याची गरज आहे. कारण रुग्णांची प्रतीक्षा यादी मोठी आहे. खासगी रुग्णालये चांगले काम करत आहेत. सरकारी रुग्णालयांनीही अवयवदानासाठी  काम करणे गरजेचे आहे. शासनाने या रुग्णालयांना मनुष्यबळ दिले पाहिजे.   - डॉ. भरत शाह, सरचिटणीस, मुंबई विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समिती- राज्यात अवयवदानात पहिल्या क्रमांकावर पुणे विभाग तर त्या खालोखाल मुंबई विभागाचा क्रमांक आहे. तर सर्वांत कमी अवयवदान छत्रपती संभाजीनगर विभागात झाले आहे. 

२०२४ मधील अवयवदान विभाग    अवयवदाते    प्राप्त अवयव  पुणे            ७०            १८१ मुंबई             ६०            १६२नागपूर        ३९            १०५ छ. संभाजीनगर    ३            ९

टॅग्स :Organ donationअवयव दानPuneपुणेchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर