शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

२०२३ मध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना यंदा २४ सार्वजनिक सुट्ट्या, मात्र...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2022 06:27 IST

अनेक सुट्ट्या शनिवार आणि रविवारी आल्याने बुडाल्या आहेत.

मुंबई : राज्य सरकारने कर्मचाऱ्यांसाठी २०२३ या वर्षातील सार्वजनिक सुट्ट्या शुक्रवारी जाहीर केल्या. त्यानुसार आगामी वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना एकूण २४ सुट्ट्या मिळाल्या आहेत. मात्र, त्यातील चार सुट्ट्या शनिवार आणि रविवार आल्यामुळे बुडाल्या आहेत.

प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी, महाशिवरात्री १८ फेब्रुवारी, छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारी, होळी (रंगपंचमी) ७ मार्च, गुढीपाडवा २२ मार्च, रामनवमी ३० मार्च, महावीर जयंती ४ एप्रिल, गुड फ्रायडे ७ एप्रिल, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल, महाराष्ट्र दिन १ मे, बुद्ध पौर्णिमा ५  मे, बकरी ईद २८ जून, मोहरम २९ जुलै, स्वातंत्र्यदिन  १५ ऑगस्ट, पारसी नववर्ष दिन १६ ऑगस्ट, गणेश चतुर्थी १९ सप्टेंबर, ईद ए मिलाद २८ सप्टेंबर, महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर, दसरा २४ ऑक्टोबर, दिवाळी लक्ष्मीपूजन १२ नोव्हेंबर, गुरूनानक जयंती २७ नोव्हेंबर, ख्रिसमस २७ डिसेंबर अशा मिळून २४ सार्वजनिक सुट्ट्या सरकारने जाहीर केल्या आहेत.

महाशिवरात्री, रमझान ईद आणि मोहरम हे सण शनिवारी तर छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि दिवाळी लक्ष्मीपूजन रविवारी असल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या या हक्काच्या चार सुट्ट्या बुडाल्या आहेत.