शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या राजीनाम्याबाबत राजभवनातून आली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 16:47 IST

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पदावरून हटवावं अशी मागणी सातत्याने विरोधकांकडून लावून धरली जात आहे

मुंबई - राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून राज्यात वाद निर्माण झाला आहे. कोश्यारी यांच्या विधानाचा सर्वच स्तरातून निषेध केला जातोय. विरोधकांनी कोश्यारींच्या विधानावरून भाजपाला कोंडीत पकडले आहे. त्यातच सोमवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे पदमुक्त होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. माध्यमांमध्ये बातम्या झळकल्या. मात्र यावर आता राजभवनातून खुलासा करण्यात आला आहे. 

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या राजीनाम्याचं वृत्त पूर्णत: निराधार आणि चुकीचे आहे. या बातमीचं खंडन राजभवनाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे पदमुक्त होण्याच्या चर्चेला विराम मिळाला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पदावरून हटवावं अशी मागणी सातत्याने विरोधकांकडून लावून धरली जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या विधानाचा निषेध करत महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यामुळे आगामी काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. 

३ डिसेंबरला रायगड किल्ल्यावर जनआक्रोश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या एका वक्तव्याचे संपूर्ण पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत. कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावरुन राज्यात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. आता भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी सुद्धा २८ नोव्हेंबरपर्यंतची दिलेली मुदत संपल्यानं आंदोलन पुकारलं आहे. राज्यपालांच्या निषेधार्थ ३ डिसेंबर रोजी रायगड किल्ल्यावर जनआक्रोश करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. 

उदयनराजे भोसले म्हणाले, हा दिवस बघण्यापेक्षा मेलो असतो तरी परवडलं असतं. असे बोलत असताना उदयनराजेंना अश्रू अनावर झाले. येत्या ३ डिसेंबर रोजी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर आक्रोश व्यक्त करणार आहोत. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई करायची नसेल तर त्यांचे नाव घेण्याचा कुणाला अधिकार नाही. असं उदयनराजेंनी खडसावले.  

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसले