शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सहा फुटांच्या मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन शक्य; मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 08:27 IST

मुंबई महापालिकेच्या कृत्रिम तलावांची उंची पाच फूट असली तरी त्यांत सहा फुटांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन करणे शक्य होणार आहे, असे पालिकेच्या एका संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 

मुंबई : मुंबई महापालिकेच्या कृत्रिम तलावांची उंची पाच फूट असली तरी त्यांत सहा फुटांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन करणे शक्य होणार आहे, असे पालिकेच्या एका संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. साधारणपणे पाच फूट उंचीच्या मूर्ती विसर्जित होऊ शकतील अशा स्वरूपाचे कृत्रिम तलाव बांधण्यात येतात. त्यामुळे सहा फूट उंचीच्या मूर्तीचे विसर्जन त्यांत होऊ शकेल का, अशी शंका उपस्थित केली जात होती. मात्र, सहा फुटांच्या उंचीच्या मूर्तीचे विसर्जन शक्य आहे, असे पालिकेतील एका अधिकाऱ्याने सांगितले. सहा फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्तींचे विसर्जन समुद्रात करण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. समुद्रात विसर्जनासाठी करावी लागणारी सगळी व्यवस्था पालिकेकडे असल्याने विसर्जनावेळी काहीही अडचण येणार नाही. सहा फुटांवरील प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींचे विसर्जन समुद्रात करण्यास परवानगी मिळाली नसती तर मोठा पेच निर्माण झाला असता. माघी गणेशोत्सवाच्या वेळी असा पेच निर्माण झाला होता. काही मंडळांच्या जास्त उंचीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यास पालिकेने परवानगी नाकारल्यामुळे त्या मूर्ती मंडळांना पुन्हा मंडपात ठेवाव्या लागल्या होत्या.

सरकारच्या भूमिकेकडे लक्षन्यायालयाच्या निर्णयानुसार पीओपीच्या मूर्तींना माघी गणेशोत्सवापर्यंत परवानगी आहे. त्यामुळे पुढील वर्षी पुन्हा या मूर्तींचा मुद्दा उपस्थित होऊ शकतो.  त्यामुळे या संदर्भात राज्य सरकार आणि न्यायालय काय भूमिका घेते याकडे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासह  बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीचेही लक्ष लागले आहे.

गणेशोत्सव समितीने मानले आभारसहा फुटांपेक्षा जास्त उंचीच्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तींचे समुद्रात विसर्जन करण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिल्याने हजारो सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, विसर्जनास परवानगी दिल्याने बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने न्यायालय आणि सरकारचे आभार मानले आहेत. जेथे कृत्रिम तलावात विसर्जन करणे शक्य नाही, अशा ठिकाणी समुद्र किंवा नैसर्गिक जलप्रवाहात विसर्जन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. फक्त विसर्जन काळात नियमांचे पालन होणे आवश्यक आहे. दरवर्षी सुमारे १२ फुटांपर्यंतच्या मूर्तींचे विसर्जन सार्वजनिक मंडळांकडून होते. त्यामुळे या निर्णयामुळे विसर्जन व्यवस्थापन सुलभ होणार असून, पर्यावरणाच्या दृष्टीनेही योग्य पावले उचलली जातील, असा विश्वास समितीचे अध्यक्ष नरेंद्र दहीबावकर यांनी व्यक्त केला.  

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवMuncipal Corporationनगर पालिकाMumbaiमुंबई