शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

...मी देशभक्त नव्हे देशप्रेमी - कन्हैया कुमार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2017 16:57 IST

देशभक्त आणि देशप्रेम या दोन्ही शब्दांमध्ये मोठा फरक आहे.  देशभक्त म्हटले की, त्यात श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेद केला जातो. मात्र प्रेम असा शब्द आहे की, त्यात सर्व काही समान असते. यामुळे मी देशभक्त नव्हे तर देशप्रेमी असल्याचे  विद्यार्थी नेता कन्हैया कुमार यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देदेशभक्त आणि देशप्रेम या दोन्ही शब्दांमध्ये मोठा फरक आहे.   मागील तीन वर्षांपासून देशभरातील महत्वाच्या शिक्षण संस्थाना केंद्र सरकारने टार्गेट केले आहे.   कलयुगातील कन्हैया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रथ रोखणार असल्याचा दुर्दम्य आशावाद कन्हैयाने यावेळी व्यक्त केला. विविध चळवळींना एका सूत्रात जोडण्यासाठी आत्मचरित्र लिहिले

औरंगाबाद, दि. ७ : देशभक्त आणि देशप्रेम या दोन्ही शब्दांमध्ये मोठा फरक आहे.  देशभक्त म्हटले की, त्यात श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेद केला जातो. मात्र प्रेम असा शब्द आहे की, त्यात सर्व काही समान असते. यामुळे मी देशभक्त नव्हे तर देशप्रेमी असल्याचे  विद्यार्थी नेता कन्हैया कुमार यांनी स्पष्ट केले.

कन्हैया कुमार लिखित ‘बिहार से तिहार’ या आत्मचरित्राच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन औरंगाबाद शहरातील तापडिया नाट्यगृहात कन्हैया कुमार यांच्या हस्ते पार पडले. तेव्हा त्यांनी उपस्थित श्रोत्यांशी मुक्तसंवाद साधला. मागील तीन वर्षांपासून देशभरातील महत्वाच्या शिक्षण संस्थाना केंद्र सरकारने टार्गेट केले आहे.  शिक्षणव्यवस्था उधवस्त केल्यास गरीब, दलीत, अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी शिकणार नाहीत. या षडयंत्राची सुरुवात विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तींमध्ये कपात, बंद करण्यापासून झाली. या विरोधात पहिल्यांदा हैदराबाद विद्यापीठात आवाज उठवला.  या विद्यापीठात कार्यरत असलेल्या आंबेडकरवादी विद्यार्थी चळवळ संघटनेचा नेता रोहीत वेमूला याला यासाठी जबाबदार धरले. यातून त्याचा मानसिक छळ सुरू केला. हा छळ रोहीतला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यापर्यंत गेला. त्यामुळे ती आत्महत्या नव्हे तर या व्यवस्थेने केलेली नियोजित हत्याच असल्याचे कन्हैया कुमार यांनी सांगितले. 

यानंतर जेएनयू विद्यापीठाकडे लक्ष वळविण्यात आले. त्याठिकाणच्या विचारांना संपविण्यासाठी देशविरोधी घोषणाबाजी केल्याचे फेक व्हिडिओ समोर आणला. त्यातुन आम्हाला देशद्रोही ठरवले. मात्र आता त्या घटनेला १६ महिने झाले तरी अद्याप आरोपपत्र दाखल करू शकले नाहीत. यातुन संघाला केवळ देशात मनुवाद आणायचा आहे. यासाठीच शिक्षण संस्थांवर सुनियोजित हल्ले सुरू केले. या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यास आम्ही सक्षम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. डॉ. भालचंद्र कांगो यांनी अध्यक्षीय समारोप केला. या पुस्तकाच्या अनुदावर लेखक व कवी  डॉ. गणेश विसपुते यांनी भाष्य केले. पुस्तकाच्या अनुवादामागची भूमिका अनुवादक डॉ. सुधाकर शेंडगे यांनी मांडली. डॉ. कैलास अंभुरे यांनी सूत्रसंचालन केले. आभार रामप्रसाद वाहूळ यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता क्रांतीगीत आणि राष्ट्रगिताने झाली.

मोदींचा रथ रोखणारचपुराणात कन्हैयाने अर्जूनाच्या रथाचे सारथ्य करत युध्द जिंकण्यात महत्वाचा भूमिका बजावली होती. मात्र हा कलयुगातील कन्हैया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रथ रोखणार असल्याचा दुर्दम्य आशावाद कन्हैयाने यावेळी व्यक्त केला. सध्या मोदी अपराजित असल्याचे सांगतात. त्यांचा कधीही पराभव होणार नसल्याचेही बोलतात. हुकूमशाह हिटलरच्या बाबतीत ही असेच बोलले जात होते. मात्र इतिहास काय सांगतो ते आपण तपासले पाहिजे. माझे मोदींना आव्हान आहे. त्यांनी जेएनयूमध्ये विद्यार्थी निवडणूकीला उभे राहून जिंकून यावे. मात्र त्यासाठी किमान जेएनयूमध्ये प्रवेश तरी घ्यावा. ही पात्रता पूर्ण करू शकतात का? हे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकार सर्व पातळ्यावर अपयशीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येण्यापूर्वी दिलेली आश्वासने तपासा. प्रत्यक्ष सत्तेवर आल्यानंतर घेतलेल्या निर्णयांचे परिणाम तपासा. प्रत्येक गोष्टीत अपयश आल्याचे दिसून येईल. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत कोणत्याही बाबींचा देशभक्तीसोबत संबंध जोडत जनतेचे लक्ष विचलित करण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू असल्याचे कन्हैयाने सांगितले.

व्हाट्सअप विद्यापीठातून बदनामीची मोहिमनागपूरच्या संघ विचारधारेत प्रथम व्यक्ती, संस्थांना बदनाम करण्याची मोहिम राबविण्यात येते. माझ्या बदनामीसाठी तर व्हाट्सअप विद्यापीठाचा वापर केला. माझे कुटुंब, नातेवाईक यांच्यावर खुप लिहून आले. मात्र माझा जन्म हा स्वातंत्र्यसैनिकांच्या घरात झालेला आहे. माझी आई आंगणवाडीची सेविका आहे. तर माझ्या कुटुंबातील १६ जण सीमेवर देशाची सेवा करत असल्याचेही कन्हैयाने सांगितले.

या कारणांसाठी लिहिले आत्मचरित्रआत्मचरित्र लिहिण्याचे माझे वय नाही. मात्र शिक्षण संस्थांवर होणारे हल्ले, चळवळीला बदनाम करण्याचे रचलेले षडयंत्र आणि एकाच ध्येयासाठी लढणा-या विविध चळवळींना एका सूत्रात जोडण्यासाठी आत्मचरित्र लिहिले असल्याचे कन्हैया कुमार यांनी स्पष्ट केले.