शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
2
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
3
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
4
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
5
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
6
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
7
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
8
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
9
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
10
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
11
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
12
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
13
घुंगट, बुरखाधारी महिला मतदारांची पटवणार ओळख; बिहार निवडणुकीत घेणार अंगणवाडी सेविकांची मदत
14
दहशतवादासाठी आमची भूमी वापरू देणार नाही; अफगाणिस्तानचे भारताला आश्वासन
15
शांततेचा नोबेल: हुकूमशाहीकडून लोकशाहीकडे नेणारी रणरागिणी; २० वर्षांचा लढा जिंकली
16
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार : सचिन तेंडुलकर
17
अमली पदार्थ तस्करीत १०० कोटींचे व्यवहार; ईडीचे नऊ ठिकाणी छापे
18
चांगले साहित्य सहानुभूती निर्माण करते; ‘अनंतरंग’ सांस्कृतिक महोत्सवात गीतकार जावेद अख्तर यांचे प्रतिपादन
19
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
20
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!

मीच माझा आवडता व्यंगचित्रकार

By admin | Updated: January 28, 2015 01:09 IST

‘कॉमन मॅन’ म्हटला की डोळ्यासमोर येतो तो नेहमी एखाद्या कोपऱ्यात बुजरेपणाने उभा असलेला, थोडासा घाबरलेला, तणावाखाली असलेला अन् सर्व मुकाटपणे सहन करणारा गर्दीतील एक चेहरा.

नागपूरकरांनी अनुभवलेले निर्भीड ‘आर.के.’: लक्ष्मणरेषेच्या पलीकडचा ‘कॉमन मॅन’नागपूर : ‘कॉमन मॅन’ म्हटला की डोळ्यासमोर येतो तो नेहमी एखाद्या कोपऱ्यात बुजरेपणाने उभा असलेला, थोडासा घाबरलेला, तणावाखाली असलेला अन् सर्व मुकाटपणे सहन करणारा गर्दीतील एक चेहरा. परंतु या चेहऱ्याला कोट्यवधी वाचकांच्या मनात अढळपद देणारे कुंचल्याचे किमयागार आर.के.लक्ष्मण यांच्यात दडलेला ‘कॉमन मॅन’ अनुभवण्याची संधी नागपूरकरांना अनेकदा मिळाली. प्रत्येकवेळी पहायला मिळाले ते लक्ष्मणरेषेच्या पलीकडचे निर्भीड व्यक्तिमत्त्व, कमालीचे कसब असणारा एक हरहुन्नरी कलाकार. भल्याभल्या राजकारण्यांना बारीक चिमटे काढून घायाळ करणाऱ्या ‘आर.के.’ यांना राजकारणात अजिबात रस नव्हता हे ‘टॉप सिक्रेट’देखील त्यांनी उपराजधानीत ‘शेअर’ केले होते. जब तक है जान...१९९३ मध्ये ‘एमटीडीसी’तर्फे त्यांचा ताडोबा, रामटेक, खिंडसी तसेच विदर्भातील काही ठिकाणांवर दौरा आयोजित करण्यात आला असताना त्यांनी नागपूरकरांशी संवाद साधला होता. त्यावेळी व्यंगचित्रांच्या दुनियेत येऊन त्यांना ४५ हून अधिक वर्षे झाली होती अन् ‘मॅगसेसे’सह असंख्य पुरस्कार त्यांना मिळाले होते. परंतु तरीदेखील मी सर्वोत्तम व्यंगचित्र अजून काढलेच नाही असे मत त्यांनी प्रांजळपणे व्यक्त केले होते. व्यंगचित्रामधील ‘कॉमन मॅन’ला मी मुळीच शोधलेले नाही. उलट त्यानेच माझा शोध घेतला अन् जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत ‘कॉमन मॅन’ला साकारत राहील हे त्यांचे शब्द आजदेखील नागपूरकरांच्या कानामध्ये ताजे आहेत.