शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

पदाची अपेक्षा नाही, मी ‘किंगमेकर’ बनणार! पंकजा मुंडे यांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 05:45 IST

यंदाचा दसरा मेळावा भगवान गडाऐवजी बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथे झाला. राष्ट्रसंत भगवानबाबांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा आणि दसरा मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे यांनी राजकीय विरोधकांशी थेट दोन हात करण्याची भाषा केली.

बीड : मला कुठल्याही पदाची आसक्ती नाही; परंतु, राजकारणात किंगमेकरची ताकद अंगी बाळगून आहे. बाबा हयात असताना त्यांना आणि त्यांच्या पश्चात मला अनेकांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला. पण मी वाघाच्या पोटी जन्मलेली वाघीण आहे. मी कुणाला घाबरत नाही. मी पुन्हा निवडून येणारच शिवाय पाच-पन्नास आमदारही निवडून आणणार, अशा शब्दांत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राजकीय एल्गार पुकारला.

यंदाचा दसरा मेळावा भगवान गडाऐवजी बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथे झाला. राष्ट्रसंत भगवानबाबांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा आणि दसरा मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे यांनी राजकीय विरोधकांशी थेट दोन हात करण्याची भाषा केली. पंकजा भाषणास उभ्या ठाकताच ‘महाराष्ट्र का मुख्यमंत्री कैसा हो, पंकजा मुंडे जैसा हो’ अशा घोषणा देण्यात आल्या. काही वक्त्यांनीही त्यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री म्हणून केला. हाच धागा पकडून पंकजा म्हणाल्या, मला कुठल्याही पदाची आसक्ती नाही; परंतु, राजकारणात किंगमेकर बनण्याची ताकद बाळगून आहे. उद्याचा दिवस मावळायच्या आत गोपीनाथराव मुंडे ऊसतोड महामंडळाची घोषणा होईल आणि महामंडळाद्वारे ऊसतोड कामगारांना सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी घोषणाही पंकजा यांनी केली.धनंजय मुंडे यांना टोलाभगवानबाबांचे स्मारक होऊ नये म्हणून प्रयत्न झाला. उत्सव घेऊन मी लोकांची करमणूक करीत नाही, असा टोलाही पंकजा यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता लगावला. सर्व्हेचा हवाला देऊन प्रीतम मुंडेंचा मतदारसंघ धोक्यात असल्याच्या बातम्या पेरल्या जात आहेत. कागदावरचा सर्व्हे मी मानत नाही, असे सांगत त्यांनी गर्दीकडे बोट दाखवित, हा खरा सर्व्हे असे म्हटले.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडे