शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

अवैध रेती वाहतुकीला अभय

By admin | Updated: May 25, 2014 00:46 IST

कन्हान नदीतील रेतीघाट बंद असल्याने तसेच रेती माफियांवर कठोर कारवाई केली जात नसल्याने रेतीचोरीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. काही तांत्रिक कारणांमुळे महसूल विभाग या रेतीचोरीला

वाहतूक पोलिसांची बघ्यांची भूमिका : रोज शेकडो ओव्हरलोड ट्रक पोहोचतात नागपुरात

अरुण महाजन - खापरखेडा

कन्हान नदीतील रेतीघाट बंद असल्याने तसेच रेती माफियांवर कठोर कारवाई केली जात नसल्याने रेतीचोरीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. काही तांत्रिक कारणांमुळे महसूल विभाग या रेतीचोरीला आळा घालण्यासाठी सपशेल अपयशी ठरला आहे. सावनेर तालुक्यातील रोज रेतीचे शेकडो ओव्हरलोड ट्रक नागपुरात दाखल होतात. हे ट्रक वाहतूक पोलिसांसमोरून निघून जातात. मात्र, त्यावर कुठलीही कारवाई करण्याचे धाडस वाहतूक पोलीस दाखवित नाही.

सावनेर तालुक्यातील कन्हान नदीवर एकूण १२ मोठे रेतीघाट आहेत. यातील बहुतांश रेतीघाटांमधून रोज शेकडो ब्रास रेतीचोरी होत आहे. यातील बहुतेक ओव्हरलोड ट्रक सावनेर मार्गे नागपुरात पोहोचतात. नागपूर - सौंसर मार्गावर पाच पोलीस ठाणे आणि तीन नाके लागतात. शिवाय, एका ठिकाणी प्रादेशिक परिवहन विभागाचे (आरटीओ) चेक पोस्ट आहे. या मार्गावर किमान सहा ठिकाणी विविध पोलीस ठाण्यातील वाहतूक पोलिसांचा ठिय्या असतो. यातील एक ठिय्या कोराडी - नागपूर मार्गावरील पांजरा रेल्वे क्रॉसिंगजवळ आहे. हे सहा ठिय्ये पार करून रोज रेतीचे ओव्हरलोड ट्रक बिनदिक्कत नागपुरात येतात. यातील प्रत्येक ट्रकमध्ये किमान सात ब्रास रेती असते. या सर्व ठिकाणी वाहतूक पोलीस रेतीच्या ओव्हरलोड ट्रककडे पाठ फिरवित दुचाकी, चारचाकी वाहनांसह वरातींची वाहने पकडण्यात धन्यता मानतात.

ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्यांची अल्पावधीतच दैनावस्था होते. त्याचा त्रास सामान्य नागरिक व वाहनचालकांना सहन करावा लागतो. नागपूर - सौंसर मार्गावरील बहुतांश वाहतूक पोलीस हे या ट्रकचालक व मालकांकडून प्रति ट्रक प्रति फेरी २00 ते ३00 रुपये नियमित वसूल करतात. दंड भरण्यापेक्षा ही रक्कम वाहतूक पोलिसांना देणे या रेतीमाफियांना कधीही सोयीचे असते. हा सर्व प्रकार ‘सेटिंग’चा एक भाग असून, त्यात वाहतूक पोलीस व महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी लिप्त असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पोलीस अधिकारी गौरव सिंग यांनी गुरुवारी रात्री १0 वाजताच्या सुमारास खापरखेडा परिसरातील वारेगाव रेतीघाटाजवळ करवाई केली. यात त्यांनी एमएच-३१/६९११ क्रमांकाचा अवैध रेतीवाहतुकीचा ट्रक पकडला. या प्रकरणी ट्रकचालक अशफाक शेख मेहबूब रा. बिना याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. गुरुवारी सकाळी सावनेर तालुक्यातील खापा रेतीघाटातून एमएच-४0/वाय-२९१५ क्रमांकाचा अवैध रेती वाहतुकीचा ट्रक पकडला. या ट्रकमध्ये दोन ब्रास रेती आढळून आल्याने या ट्रकच्या चालक व मालकावर ६४00 रुपयांचा दंड आकारून सोडून देण्यात आला होता. या ट्रकमालकाकडे रॉयल्टी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याच दिवसी टेंभुरडोह रेतीघाटातून निघालेला एमएच-३१/डीएस-१८१५ क्रमांकाचा ट्रक महसूल व पोलिसांच्या पथकाने पाठलाग करून खापा टी पॉईंटजवळ अडविण्याचा प्रयत्न केला. यात अपयश आल्याने हा ट्रक करंभाड शिवारात अडविण्यात आला. या ट्रकचा चालक अरविंद अण्णा ठाकरे रा. झिंगाबाई टाकळी व मालक अजय सीताराम ठाकूर रा. नागपूर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली. हा सर्व घटनाक्रम पाहता महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचार्‍यांच्या मनात रेतीमाफियांविषयीची भीती असल्याचे दिसून येते.