शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

इज्तेमाला लोटला जनसागर, आज समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 10:44 IST

इतिहासात प्रथमच होत असलेल्या राज्यस्तरीय इज्तेमाने गर्दीचे सर्व विक्रम रविवारी मोडले. दोन हजारांपेक्षा अधिक एकरावर पसरलेल्या या इज्तेमामध्ये पाय ठेवायलाही जागा नाही.

औरंगाबाद : शहराच्या इतिहासात प्रथमच होत असलेल्या राज्यस्तरीय इज्तेमाने गर्दीचे सर्व विक्रम रविवारी मोडले. दोन हजारांपेक्षा अधिक एकरावर पसरलेल्या या इज्तेमामध्ये पाय ठेवायलाही जागा नाही. सोमवारी सकाळी ११ वा. दिल्लीच्या मकरजचे प्रमुख हजरत मौलाना साद साहब यांच्या उपस्थितीत विशेष दुआचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे साथींचा ओघ रविवारीही सुरूच होता.दिवसभर वाळूज ते लिंबेजळगाव रस्त्यावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. दुपारनंतर हजारो साथींनी इज्तेमास्थळी पायी जाणे पसंत केले. तीन हजार सामूहिक विवाह सोहळ््याने इज्तेमाला चाँद लावले.शनिवारी इज्तेमाच्या पहिल्याच दिवशी देशभरातून साथी आले. विदेशातूनही मोठ्या संख्येने इज्तेमासाठी जमातचे साथी आले. रविवारी सकाळी ६ वाजेपासून शहरात मोठ्या प्रमाणात साथी येणे सुरूच होते.रेल्वे स्टेशन, मध्यवर्ती बसस्थानकासह खासगी वाहनांद्वारे येणाºयांची संख्या लाखोंच्या घरात होती. रविवारी इज्तेमाच्या मुख्य मंडपाच्या बाहेर पाय ठेवायला जागा नव्हती.दुपारी ‘जोहर’आणि सायंकाळी ‘असर’च्या नमाजसाठी अक्षरश: जनसागरच उसळला होता. सकाळी ‘फजर’च्या नमाजनंतर मौलाना जमशेदजी व दुपारी जोहरनंतर मौलाना शमीम साहब यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.सायंकाळी जिल्हानिहाय मंडपांमध्ये सामूहिक विवाह लावण्यात आले. हजरत मौलाना साद साहब यांनी ‘निकाह’वर सविस्तर मार्गदर्शन केले. प्रेषित हजरत मोहंमद पैगंबर यांचा आदर्श आपल्यासमोर ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादIjtema Aurangabad 2018इज्तेमा औरंगाबाद २०१८