शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

मध्ययुगीन मराठी हस्तलिखित ग्रंथांची उपेक्षा

By admin | Updated: April 23, 2017 00:49 IST

जागतिक ग्रंथ दिन : राज्यातील संशोधकांना आव्हान; सहा राज्यांत दीड लाख ग्रंथ

संदीप आडनाईक --कोल्हापूर --आधुनिक व उत्तर आधुनिक तसेच स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडावर संशोधित झालेल्या अनेक संदर्भांवर आधारित अनेक कथा-कादंबऱ्यांसह इतर संशोधनपर साहित्याच्या पलीकडेही मराठीचे अस्तित्व आहे, यावर चर्चाही न करणाऱ्या ‘मराठीचा बोलु कवतिके’ म्हणणाऱ्या संशोधक-लेखकांकडून मध्ययुगीन कालखंडातील किमान सहा राज्यांत अस्तित्वात असलेल्या १ लाख ४५ हजारांहून अधिक दुर्मीळ मराठी हस्तलिखित ग्रंथ उपेक्षित असल्याचे चित्र ‘जागतिक ग्रंथ दिना’निमित्त समोर येत आहे.ग्रंथ, वेद, व्याकरण, कोशशास्त्र, योग, बौद्ध धर्म, जैन धर्म, भारतीय तत्त्वज्ञान, इतिहास, साहित्य अशा विविध विषयांशी संबंधित अनेक संशोधन ग्रंथ सध्या महाराष्ट्रातील संशोधनपर तसेच इतर खासगी संस्थांमध्ये उपलब्ध असून त्यामध्ये संस्कृत, पाली, प्राकृत व इतर भाषांमधील वाङ्मयाचा समावेश आहे; परंतु त्यावर अभ्यास करणाऱ्या संशोधकांची सध्या वानवा आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची भाषा करणाऱ्यांनी प्रथम मध्ययुगीन कालखंडातील विविध अप्रसिद्ध वाङ्मय प्रकाशात आणले पाहिजे. सध्या बडोदा, तंजावर, पुण्यातील भांडारकर संस्था, धुळ्यातील वि. का. राजवाडे यांच्या नावाची संस्था, बिदर, कल्याण, हैदराबाद, धारवाड, ग्वाल्हेर, इंदौर या ठिकाणी अनेक दुर्मीळ हस्तलिखिते पडून आहेत. महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांत अनेक दुर्मीळ हस्तलिखिते उपलब्ध आहेत; परंतु त्यांच्यावर अभ्यास करणारे संशोधक नाहीत. केंद्र सरकारच्या ‘राष्ट्रीय पाण्डुलिपि मिशन’चे महाराष्ट्र राज्यासाठीचे केंद्र भांडारकर संस्थेमध्ये हस्तलिखितांच्या नोंदणीचे आणि वैज्ञानिक पद्धतीने जतन करण्याचे काम चालते. या संस्थेकडे अठ्ठावीस हजार हस्तलिखितांचा संग्रह आहे. प्राचीन भारताच्या वाङ्मयीन इतिहासात अभिजात भाषा मानल्या जाणाऱ्या प्राकृत आणि पालीसह अर्धमागधी, महाराष्ट्री, जैन महाराष्ट्री, इ. प्राकृत भाषांतील साहित्याचे संशोधन अस्पर्शित आहे. महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तमिळनाडू या राज्यांत बाराव्या शतकातील लाखो हस्तलिखित ग्रंथ अजूनही संशोधनाच्या प्रतीक्षेत आहेत. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या, अशी ओरड करणाऱ्या साहित्यिक, प्राध्यापक, लेखक, संशोधकांनी ही माहिती प्रकाशात आणण्याची जबाबदारी घ्यावी.- डॉ. गणेश नेर्लेकर-देसाई, हस्तलिखित तज्ज्ञ, केंद्रीय मोडी लिपी समिती सदस्य. अभ्यासकांची वानवाहस्तलिखितांचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञ संशोधकांची राज्यातच नव्हे, तर देशभरात वानवा आहे. तमिळनाडू युनिव्हर्सिटीतील तंजावरचे डॉ. विवेकानंद गोपाळ, बडोदा येथील डॉ. वाकणकर आणि कोल्हापुरातील मोडी लिपी समितीचे सदस्य डॉ. गणेश नेर्लेकर-देसाई आणि डॉ. पा. नां. कुलकर्णी एवढेच हाताच्या बोटांवर मोजता येणारे संशोधक या विषयावर अभ्यास करीत आहेत.कोल्हापुरातील दुर्मीळ हस्तलिखितांचा अभ्यास गरजेचाकोल्हापुरातील दुर्मीळ हस्तलिखितांचा अभ्यास होणे गरजेचे आहे. शिवाजी विद्यापीठ, करवीर नगर वाचन मंदिर, शुक्रवार पेठेतील जैन मठ, खासगी मठ, संस्था, मंदिरे तसेच अनेक राजकीय, तसेच राजघराण्यातील व्यक्तींकडे माहितीचा खजिना आहे. त्यांचा अभ्यास होणे ही काळाची गरज आहे.