शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

एवढ्या छोट्या गोष्टी तुम्ही मीडियासमोर आणणार असाल, तर मीही 'ती' गोष्ट...; केसरकरांचं उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 18:41 IST

मीही तुमच्यासाठी काही तरी केले आहे आणि ती गोष्ट यापेक्षाही १०० पट अधिक महत्वाची आहे. पण मी आतापर्यंत ही गोष्ट तुमच्या आदरापोटी महाराष्ट्रातील जनतेसमोर आणलेली नाही.

मी पूर्वीच आमची पॉलिसी जाहीर केली आहे, की उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आम्ही काहीही बोलणार नाही. कारण ते आमचे नेते आहेत आणि आम्हाला प्रीय आहेत, आम्हाला त्यांचा आदर आहे. मात्र, जे मुद्दे उपस्थित केले जातील, त्या मुद्द्यांचे मी नक्कीच उत्तर देईन. जर तुम्ही छोट्या-छोट्या गोष्टी मीडियासमोर आणणार असाल आणि आरोप करणार असाल, तर मला जाहीर आव्हान करायचे आहे..., मीही तुमच्यासाठी काही तरी केले आहे आणि ती गोष्ट 'या'पेक्षाही १०० पट अधिक महत्वाची आहे. पण मी आतापर्यंत ही गोष्ट तुमच्या आदरापोटी महाराष्ट्रातील जनतेसमोर आणलेली नाही. पण येत्या दोन दिवसांत ही गोष्ट मी अवश्य जनतेसमोर आणणार, असे आव्हान आमदार दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना केले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. 

केसरकर म्हणाले, "मुंबईच्या महापौरांनी एक ट्विट केले आहे, की केसरकरांनी आपल्या नातवासाठी काय केले ते विसरू नये. पण, मी शिवसेनेचा अधिकृत प्रवक्ता आहे. यामुळे माझ्यासाठी काही विशेष केले आहे की काय, असे काही लोकांच्या मनात येण्याची शक्यता आहे. म्हणून मी हा खुलासा देत आहे. मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती, की माझ्या नातवाला एका इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रवेश मिळावा. मात्र, ते अॅडमिशन करून देऊ शकले नाही. त्यांनी मला सांगितले, की त्या ऐवजी मुंबईतील एका स्कूलमध्ये मी तुला अॅडमिशन घेऊन देतो आणि त्यांनी ते घेऊन दिले. यासाठी मी त्यांचे आभारही मानले. माझा नातू एक वर्षभर तेथे राहील आणि आम्ही पुन्हा पुढच्या वर्षी इंटरनॅशनल स्कुलमध्ये अर्ज करू आणि तो रितसर इंटरनॅशनल स्कूलमध्ये जाईल. त्यासाठी मी पुन्हा यांच्याकडे विनंती करणार नाही. कारण आम्ही जेव्हा हजारो लोकांची पर्सनल कामे करत असतो, तेव्हा ते आम्ही सार्वजनिक बोलत नाही. कारण या छोट्या छोट्या गोष्टी असतात. 

'ती' गोष्ट यापेक्षाही १०० पट अधिक महत्वाची - एखाद्या शाळेत अथवा महाविद्यालयात प्रवेश, या गोष्टी आम्ही रोज करत असतो. पण एवढ्या छोट्या गोष्टी जर तुम्ही मीडियासमोर आणणार असाल आणि आरोप करणार असाल, तर मला जाहीर आव्हान करायचे आहे, की जसे तुम्ही माझ्या अॅडमिशनसाठी, भलेही तुम्ही मला इंटरनॅशनल स्कूलमध्ये अॅडमिशन मिळवून देऊ शकला नाहीत. लोकल स्कूलमध्ये मिळवून दिले. यासाठी मी तुमचा आभारी आहे. पण मीही तुमच्यासाठी काही तरी केले आहे आणि ती गोष्ट यापेक्षाही १०० पट अधिक महत्वाची आहे. पण मी आतापर्यंत ही गोष्ट तुमच्या आदरापोटी महाराष्ट्रातील जनतेसमोर आणलेली नाही. पण येत्या दोन दिवसांत ही गोष्ट मी अवश्य जनतेसमोर आणणार. कारण आदित्य ठाकरे यांनी माझ्या मतदार संघात जाणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी अवश्य जावे. पण मी जे केले आहे, ते बघितल्यानंतर मी निश्चतपणे बोलेल आणि त्यानंतर महाराष्ट्रातील जनतेला कळेल, की जे सांगितले जाते, की आदित्यंवर आरोप झाले, मातोश्रीवर आरोप झाले, पण कुणीही काही केले नाही. हे जे बोलले जाते, याचे उत्तर तुम्हाला मिळेल. 

सेना आणि भाजप संबंधांसंदर्भातील उत्तर त्यातून मिळेल -सेना आणि भाजप संबंधांसंदर्भातील उत्तर तुम्हाला त्यातून मिळेल. कारण आम्ही अनेक गोष्टी आदरापोटी बोलत नसतो. पण तुम्हाला असे बोलणार असाल, तर आम्हालाही ते बोलता येते. म्हणून, कुणी तरी मोठी व्यक्ती आहे. मोठ्या व्यक्तीशी संबंधित आहे आणि कोण सामान्य? आमच्यासारखी लोक सामान्य असतात. पण लोकशाहीत आम्हाला तेवढाच अधिकार दिला आहे आणि तो अधिकार आम्हाला जनतेने आणि आमच्या घटनेने दिला आहे. त्यामुळे आम्हीही बोलू शकतो. त्यामुळे तसे बोलायची पाळी आम्ही नाही आणली. तुम्ही आणली आहे. म्हणून ते बोलायला लागेल. ही वस्तुस्थिती आहे," अशा शब्दात केसरकर यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे. 

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना