शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

‘धोती -कुडता’ परिधान केला तर आम्ही असभ्य, असंस्कृत का ; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 21:41 IST

आपल्या मताशी समोरचा सहमत नसेल तर त्याच्यावर विशिष्ट विचारांचा शिक्का मारला जातो. आम्हीच तेवढे उदारमतवादी असे लोकांना वाटते. बाकीच्यांना जातीय, धर्मांध ठरवले जाते,  अशी टीका राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली.

पुणे : ’सभ्य’ किंवा‘सुसंस्कृत’ समाजामधील सर्व लोक ही ’उदारमतवादी’ आणि  ‘धोती’, ‘कुडता’ वेश परिधान केला तर आम्ही ‘असभ्य’ आणि ‘असंस्कृत’ अशी मिश्कील टिप्पणी करीत, आपल्या मताशी समोरचा सहमत नसेल तर त्याच्यावर विशिष्ट विचारांचा शिक्का मारला जातो. आम्हीच तेवढे उदारमतवादी असे लोकांना वाटते. बाकीच्यांना जातीय, धर्मांध ठरवले जाते,  अशी टीका राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली.      दखनी अदाब फौंडेशनतर्फे  ‘ डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हल’चे उदघाटन भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदा सत्यपाल सिंह, प्रसिद्ध दिगदर्शक विशाल  भारद्वाज, साखर आयुक्त सौरभराव आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम, मनोज ठाकूर उपस्थित होते.  यावेळी मोनिका सिंग यांच्या गझलसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. ’’सभ्य’ समाजामध्ये  ‘उदारमतवादा’ताच्या नावाखाली वावरणा-या मंडळीना कोश्यारी यांनी चांगलेच लक्ष्य केले. केवळ आम्हीच उदारमतवादी; बाकीचे प्रतिगामी,  असा शिक्का मारण्याची सध्या चढाओढ लागली आहे. लोक स्वत:च स्वत:ला उदारमतवादी म्हणून जाहीर करतात. समोरची व्यक्ती आपल्या विचारांशी मिळती-जुळती नाही म्हणून ती प्रगतिशील वाटत नाही. त्या व्यक्तीची प्रगती कशी होईल, हा विचार करायचा सोडून तिच्यावर जातीय, धर्मांध, पुराणमतवादी असे शिक्के मारून कसे चालेल ? किमान साहित्यिक आणि कलाकारांनी तरी हे उद्योग करू नयेत, असा सल्ला ही कोश्यारी यांनी दिला. ’ साहित्य’ हा समाजाचा आरसा असतो. मात्र लेखणी आणि चित्रपटाचा परिणामदेखील समाजमनावर होत असतो. त्यामुळे या दोन्हींमध्ये खूप मोठी ताकद आहे.       एखादा निर्माता आणि साहित्यिक या ताकदीचा उपयोग कसा करतात हा प्रश्न आहे. देश एकसंध राहाण्यासाठी आणि देशाबददलचा अभिमान जागृत ठेवण्यासाठी साहित्यिक आणि कलाकार नक्कीच योगदान देऊ शकतात. त्यांच्या प्रयत्नातून नवनीत समोर येऊ शकेल आणि समाजाला नवी दिशा मिळू शकेल, असा विश्वासही कोश्यारी यांनी व्यक्त केला.

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीBal gandharva Rangmandirबालगंधर्व रंगमंदिर