शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

...तर दुष्काळ पडणार नाही !

By admin | Updated: September 19, 2015 21:18 IST

दुष्काळाचे सावट असणाऱ्या महाराष्ट्रात शुक्रवारी चांगला पाऊस झाला आहे; पण केवळ पाऊस होऊन काही होणार नाही. कारण पडणाऱ्या पावसाचे पाणी साठविले गेले पाहिजे आणि

- उल्हास परांजपे (लेखक जलवर्धिनी प्रतिष्ठानचे विश्वस्त आहेत.)

दुष्काळाचे सावट असणाऱ्या महाराष्ट्रात शुक्रवारी चांगला पाऊस झाला आहे; पण केवळ पाऊस होऊन काही होणार नाही. कारण पडणाऱ्या पावसाचे पाणी साठविले गेले पाहिजे आणि येथेच आपण गल्लत करीत आहोत. पावसाच्या पाण्याची आपल्याकडून साठवणूक होत नसल्याने पावसाळा वगळता पुढील आठ महिने भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. परिणामी महाराष्ट्रावरील दुष्काळाचे सावट नाहीसे करावयाचे असेल तर पाणी साठविणे सर्वात महत्त्वाचे आहे.मुंबई वगळता उर्वरित राज्याची परिस्थिती वेगळी आहे. शहरी भाग आणि ग्रामीण भागातील पाण्याची मागणी आणि पाण्याचा पुरवठा यात खूप मोठा फरक आहे. शहरी भागांना उर्वरित आठ महिने तलावांतील पाणी पुरविले जात असल्याने त्यांना फार काही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत नाही, परंतु पाणीकपातीला सामोरे जावे लागते. आणि ग्रामीण भागात पावसाचे पाणी साठविण्यात येत नसल्याने पावसाळा वगळता पुढील आठ महिने येथील विहीर आणि तलाव कोरडे पडतात. नेमके हेच होऊ नये आणि भविष्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण होऊ नये, म्हणून आपण बोअरवेल किंवा विहिरींकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे.दुष्काळी भागात पाणीटंचाई निर्माण होऊ नये म्हणून आता जो काही पाऊस पडतो, त्याचे पाणी साठविण्याची गरज आहे. त्यासाठी माध्यम विहीर, बोअरवेल अथवा तळी का असेनात. महत्त्वाचे म्हणजे पाणी साठणे आहे. कारण शुक्रवारी जो पाऊस झाला त्या पावसाचे कित्येक पाणी आतापर्यंत समुद्राला मिळाले असेल. आपल्याकडे हे पावसाचे पाणी साठविण्याची व्यवस्था नाही, हे दुर्दैव आहे. आणि जी व्यवस्था आहे, ती पुरेशी नाही. म्हणूनच पाणी अडविण्यासह ते जिरविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेसह उर्वरित सर्व यंत्रणांचा समन्वय गरजेचा आहे. जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर यासाठी काम होणे गरजेचे आहे.विशेषत: ग्रामीण भागात पाण्याचे नियोजन फार महत्त्वाचे आहे. पिण्याचे पाणी असो वा शेतीसाठीचे पाणी. ग्रामीण भागातील पाण्याच्या नियोजनासाठी भूगर्भशास्त्रज्ञ अथवा भूगर्भजलज्ज्ञ यांची मदत घेतली तर सोन्याहून पिवळे आहे. ग्रामीण भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची याकामी मदत घेतली तर पाण्याचे निम्मे प्रश्न सुटतील. शिवाय पाण्याचा पुनर्वापर केला तरी पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणार नाही. एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे तो म्हणजे हा, की पाण्याची मागणी काही केले तरी ती वाढणारच. त्या तुलनेत पुरवठा मात्र वाढणार नाही. म्हणून जलसाठ्यांची काळजी घेतली तर निश्चितच दिलासा मिळेल.दुसरे असे की मुंबईसारख्या मोठ्या शहरांना पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत नाही. त्यांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यात पाणीकपात झाली तरी त्यांना दररोज पाणी मिळते. ग्रामीण भागात असे होत नाही. मुंबईला हा प्रश्न भेडसावत नाही. कारण त्यांना लागणाऱ्या पाण्यासाठी जलसाठ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईला एकूण सात तलावांतून पाणीपुरवठा केला जातो. हे जलसाठे भरल्यास पावसाळा वगळता पुढील आठ महिने मुंबईकरांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत नाही. मात्र मुंबईत वाया जाणाऱ्या पाण्याचा प्रश्न तोंड आ वासून उभा आहे. मुंबईतल्या वाया जाणाऱ्या पाण्याचे नियोजन केले तर मुंबईकर पाणीकपातीवरही सहज मात करतील.