शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अनुदान वाढले, तर शिजेल पोषण आहार; आगाऊ रक्कम दिली तरच राबविणार योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2022 07:57 IST

येत्या काही दिवसांत ही मागणी पूर्ण न झाल्यास शालेय पोषण आहार योजना राबविणार नाही, असा इशारा मुख्याध्यापक संघाने शिक्षण विभागाला दिला आहे.  

मुंबई :  विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेली शालेय पोषण आहार योजना यंदा अडचणीत येणार असल्याची चिन्हे आहेत. शालेय पोषण आहाराच्या निधीमध्ये सरकारने वाढ करावीच, शिवाय आवश्यक धान्य, आदी वस्तूंसह इंधन आणि खाद्यतेलाचा पुरवठाही शिक्षण विभागाने करावा, अशी मागणी राज्य मुख्याध्यापक महासंघाकडून करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत ही मागणी पूर्ण न झाल्यास शालेय पोषण आहार योजना राबविणार नाही, असा इशारा मुख्याध्यापक संघाने शिक्षण विभागाला दिला आहे.  

विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढावी, तसेच त्यांना सकस व पौष्टिक आहार मिळावा, विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी शासनाकडून मध्यान्ह पोषण आहार योजना सुरू करण्यात आली. राज्य सरकारने जिल्हा परिषदेच्या शाळा तसेच अनुदानित तत्त्वावरील खासगी शाळांमध्ये पोषण आहार योजना सुरू केली. यात विद्यार्थ्यांना तांदूळ, मूग डाळ, मसूर डाळ, वाटाणा, मटकी या साहित्याचा पोषण आहार करून दिला जातो.

यामध्ये पहिली ते पाचवीसाठी प्रतिविद्यार्थी तांदूळ आणि डाळी, कडधान्य दिले जाते. गावातील महिला बचत गटांच्या माध्यमातून ही योजना चालवली जात आहे. त्यासाठी बचत गटांना पहिली ते पाचवीपर्यंतच्या प्रती विद्यार्थ्यामागे खर्च असा इंधन आणि भाजीपाल्याचा खर्च दिला जातो.  मात्र, इंधन व तेलाचे दर वाढल्याने बचत गटांनी ही जबाबदारी नाकारली असून, शाळा स्तरावर व्यवस्था करावी, असे म्हटले आहे, अशी माहिती संघाचे प्रवक्ता महेंद्र गणपुले यांनी दिली. 

आगाऊ रक्कम दिली तरच राबविणार योजना इंधन, तेलाचे दर तिप्पट वाढलेले असताना त्याच्या मोबदल्यात अतिशय तुटपुंजे अनुदान सरकार देत आहे. त्यातही अनुदान ४ ते ५ महिने उशिरा मिळते. जर पोषण आहाराचा दर्जा चांगला नसला, तर मुख्याध्यापकांना दोष दिला जातो. एकूणच योजनाही राबवायची आणि आर्थिक भुर्दंडही सहन करायचा, हे अशक्य असल्याची प्रतिक्रिया गणपुले यांनी दिली. दरम्यान, शासनाने पोषण आहाराचे सर्व साहित्य पुरविले आणि आवश्यक अनुदानात वाढ करून ती रक्कम आगाऊ दिली, तरच ती राबवू, असा इशाराही मुख्याध्यापक संघाने दिला आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी