शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

घरातील काम करायची नसतील तर लग्नाआधी मुलीने सांगायला हवं; हायकोर्टाचा निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2022 16:39 IST

कुटुंबात राहणाऱ्या महिलेला काम सांगितले याचा अर्थ तिला नोकरासारखी वागणूक मिळते असं नाही असं हायकोर्टानं म्हटलं आहे.

औरंगाबाद - मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिलेल्या एका निकालाची चर्चा चांगलीच चर्चेत आली आहे. लग्न झालेल्या विवाहितेला घरातील कामं करायला सांगणं म्हणजे तिला नोकरासारखं वागवणं असा अर्थ होत नाही असं कोर्टानं म्हटलं आहे. त्यामुळे पती किंवा सासरच्या लोकांकडून केलेल्या कृतीबाबत आरोप स्पष्ट झाल्याशिवाय ते कौर्य आहे की नाही हे सांगता येणार नसल्याचं हायकोर्टानं सांगितले आहे. 

अनेकदा काही महिलांकडून सासरच्या मंडळींविरोधात कामाचा जाच केल्याचा आरोप करण्यात येतो. त्यादृष्टीने हा महत्त्वाचा निकाल आहे. कुटुंबात राहणाऱ्या महिलेला काम सांगितले याचा अर्थ तिला नोकरासारखी वागणूक मिळते असं नाही. तिला लग्नानंतर घरातील कामे करायची नसतील तर तिने लग्नापूर्वी सांगायला हवं. जेणेकरून मुलाला तिच्याशी लग्न करायचं की नाही ठरवता येईल. त्यामुळे ही समस्या निर्माण होणार नाही असं हायकोर्टानं निकालात सांगितले आहे. 

एका महिलेने तिचा पती आणि सासरच्या कुटुंबाविरोधात पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवला होता. त्याविरोधात औरंगाबाद खंडपीठातील न्या. विभा कांकनवाडी आणि न्या. राजेश पाटील यांनी हा निकाल देत FIR रद्दबातल करण्याचे आदेश दिले. ४९८ अ घरगुती हिंसाचारानुसार, महिलेने पती आणि तिच्या सासरकडच्या लोकांवर आरोप केले होते. लग्नानंतर तिला नोकरासारखी वागणूक देण्यात आली. सासरच्या लोकांनी चारचाकी खरेदी करण्यासाठी ४ लाख रुपये मागितल्याचा आरोप महिलेने केला होता. 

माझ्या घरच्यांना परवडत नाही असं सांगितल्यानंतर सासरच्यांनी मानसिक आणि शारिरीक त्रास घेण्यास सुरुवात केली. त्याचसोबत मुलगा व्हावा यासाठी डॉक्टरकडेही घेऊन गेले. सासू आणि नणंदेकडून मारहाण व्हायची. ४ लाख दिल्याशिवाय घरी राहू देणार नाही अशी धमकी दिल्याचा आरोपही महिलेने सासरच्यांवर लावला. 

सासरच्या मंडळींनी केला युक्तिवादसासरकडून बाजू मांडण्यात असलेले वकील सागर भिंगारे यांनी कोर्टात म्हटलं की, सदर महिलेने आधीचा पती आणि त्याच्या कुटुंबीयांवर असेच आरोप केले होते. त्यानंतर ते आरोपातून निर्दोष सुटले. पत्नीला असे आरोप करण्याची सवय लागल्याचं दिसून येते. १२ डिसेंबर २०१९ ला त्यांचे लग्न झाले. सप्टेंबर २०२० मध्ये महिलेने तक्रार दाखल केली. महिलेने आरोप केलेली घटना वडिलांच्या घरी २७ जून २०२० मध्ये घडली. म्हणजे लग्नाच्या ६-७ महिन्यात हा प्रकार झाला. याच काळात २८ फेब्रुवारी २०२० रोजी पतीने १७ लाखांची कार खरेदी केली. त्यामुळे माहेरी पैसे मागण्याचा प्रश्नच नव्हता. पोलीस तपास आणि वकिलांच्या युक्तिवादानंतर ही केस FIR नुसार उभी राहू शकत नाही असा निष्कर्ष कोर्टाने काढला.  

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय