शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

अध्यादेश मंजूर झाल्यास न्यायालयात जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 04:14 IST

खुल्या वर्गातील पालकांची भूमिका । मराठा पदव्युत्तर प्रवेशाला विरोध

मुंबई : सुमारे अडीचशे मराठा विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशनिश्चितीसाठी राज्य सरकारने अध्यादेश जाहीरकेला असला, तरी खुल्या वर्गातील विद्यार्थी आणि पालकांनी त्याला कडाडून विरोध केला आहे. त्यासाठी या विद्यार्थी आणि पालकांनी शनिवारी धरणेही दिले. मात्र, तेथे कोणताही नेता फिरकला नाही. त्यामुळे सरकार विद्यार्थ्यांमध्ये दुजाभाव करत असल्याचा आरोप करीत जर लागू झाल्यास न्यायालयात जाण्याची भूमिका पालकांनी घेतली आहे.

सरकारच्या अध्यादेशावर राज्यपालांनी सही केल्यास मराठा आरक्षणाचे प्रवेश निश्चित होऊन खुल्या वगार्तील विद्यार्थ्यांच्या जागा कमी होणार आहेत. विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशाच्या जागा या गुणवत्तेवर नाही, तर आरक्षणावर मिळणार असल्याने त्याला आमचा विरोध असल्याचे पालक सुद्धा शेणॉय यांनी म्हटले. त्यामुळे सरकारने यावर पुनर्विचार करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली.

जर अध्यादेश लागू झालाच, तर आम्ही न्यायालयात जाण्याची तयारी ठेवली असल्याची माहिती शेणॉय यांनी दिली. न्यायालयीन प्रक्रियेत गरज भासल्यास आपण अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांची मदत घेऊ अशी, प्रतिक्रिया खुल्या वगार्तील पालकांनी व्यक्त केली आहे.अ‍ॅड. सदावर्ते यांचे राज्यपालांना पत्रवैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत खुल्या वगार्तील विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत. मराठा विद्यार्थ्याच्या प्रवेशासाठी सरकारने काढलेल्या अध्यादेशावर राज्यपालांनी सही कारण्यापूर्वी सदावर्ते यांनी राज्यपालांना पत्र दिले आहे. कलम २१३ च्या अधिकाराचा वापर करण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय विचारात घ्यावा, अशी विनंती त्यांनी या पत्राद्वारे केली आहे. या अध्यादेशावर सही करू नये आणि पुनर्विचारासाठी निर्णय राज्य सरकारकडे परत पाठवावा, अशी मागणी सदावर्ते यांनी पत्रात केली आहे. याआधीही मराठा आरक्षणाविरोधात सदावर्ते यांनी याचिका दाखल केली होती.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण