शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

विरोधकांनी कितीही कांगावा केला तरी पुढचे सरकार भाजपाचेच- रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 23:43 IST

देशातील काळा पैसा बाहेर यावा, यासाठी भाजपा सरकारने जाहीर केलेला नोटाबंदीचा निर्णय निश्चितपणे यशस्वी झाला. याशिवाय कर चोरी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी देशभरात ‘जीएसटी’ची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली.

वाशिम : देशातील काळा पैसा बाहेर यावा, यासाठी भाजपा सरकारने जाहीर केलेला नोटाबंदीचा निर्णय निश्चितपणे यशस्वी झाला. याशिवाय कर चोरी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी देशभरात ‘जीएसटी’ची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. मुद्रा, उज्ज्वला, पीकविमा, ग्रामसडक यासारख्या महत्त्वाकांक्षी योजना राबवून तळागाळातील लोकांचे हित जोपासले जात आहे. त्यामुळे विरोधकांनी कितीही कांगावा केला तरी पुढचे सरकारही भाजपाचेच राहील, असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत बालून दाखविला.विद्यमान भाजपा सरकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलणार असल्याच्या वावड्या विरोधकांकडून उठविल्या जात आहेत; परंतु संविधान बदलण्याच्या नव्हे; तर ते अधिक मजबूत करण्याचा विचार सरकारचा असल्याचे सांगून आठवले म्हणाले, भाजपा सरकारने आपल्या कारकिर्दीत ‘अ‍ॅॅट्रॉसिटी अ‍ॅॅक्ट’ला कुठलाही धक्का बसू दिला नाही. याशिवाय जातीनिहाय आरक्षणाचा विषयदेखील सरकार अभ्यासपूर्ण हाताळत आहे. सरकारच्या याच सर्वसामान्यांच्या हितकारी ध्येयधोरणांमुळे ‘आरपीआय’ यापुढेही भाजपासोबतच राहणार आहे.कोरेगाव भीमा येथील दंगल, संभाजी भिडे यांची भूमिका, आदींबाबत छेडले असता, कोरेगाव भीमा येथील दंगल सवर्णांनी घडवून आणल्याचे सांगून त्याच्याशी एल्गार परिषदेचा कुठलाही संबंध नसल्याचे ते म्हणाले. संविधानाला विरोध करून अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणारी भूमिका संभाजी भिडे यांनी बाळगली आहे. पोलीस प्रशासनाने यादृष्टीने तपास करावा, असेही आठवले म्हणाले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेMaharashtraमहाराष्ट्र