शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

नाटकांच्या सादरीकरणात आक्षेपार्ह आढळल्यास नाटकाची मान्यता रद्द होणार : अरूण नलावडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 11:51 IST

अनेकदा उद्या प्रयोग असताना ऐनवेळी संहिता मान्यतेसाठी पाठवली जाते.मात्र, संहितेनुसार प्रत्यक्ष नाटकाचा प्रयोग सादर होतोच असे नाही.

ठळक मुद्देसंहितांना व्हॉट्सअ‍ॅपद्वारे मान्यता मंडळाने धोरण लवचिक केले तरीही नियम मोडले जात असल्याचे निदर्शनास कायमस्वरुपीचे प्रमाणपत्र घेण्यास कलाकारांना अवधी मिळत असल्याने त्यांची सोय

पुणे : नाटकातील संवादामध्ये बदल आणि अंगविक्षेपांवरील आक्षेप अशा स्वरूपाच्या काही नाटकांच्या तक्रारींमुळे रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाने (नाट्यसेन्सॉर बोड) यापुढील काळात नाटकाच्या सादरीकरणामध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास नाटकाची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सादरीकरणात काही आक्षेपार्ह आढळले किंवा काही तक्रार आली तर मान्यता रद्द होऊ शकते, अशी तळटीप संहितेला मान्यता देणा पत्रामध्ये यापुढे खास लिहिली जाणार आहे.      नाटक हे समाजामध्ये प्रभावी माध्यम म्हणून ओळखले जाते. रंगभूमीवर कोणतीही कला सादर करण्यापूर्वी मंडळाकडून संहिता मान्य करून घेणे बंधनकारक आहे. अनेकदा उद्या प्रयोग असताना ऐनवेळी संहिता मान्यतेसाठी पाठवली जाते.मात्र, संहितेनुसार प्रत्यक्ष नाटकाचा प्रयोग सादर होतोच असे नाही. संवादामध्ये होणारे बदल आणि अंगविक्षेपकांना घेतले जाणारे आक्षेप यामुळे समाजात अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.  त्यास मान्यता दिल्यानंतर प्रत्यक्षात सादरीकरण वेगळेच असल्याचे प्रकार घडले आहेत. मंडळाने धोरण लवचिक केले तरीही नियम मोडले जात असल्याचे दिसून आले आहे. मंडळाने घालून दिलेल्या नियमावलीचा भंग होत असेल आणि समाजामध्ये अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असेल तर अशा नाटकांविरुद्ध मंडळाला कारवाई करावीच लागेल, याकडे नलावडे यांनी लक्ष वेधले. कोणत्याही सादरीकरणास अटींवर मान्यता देण्यात येते. त्यामुळे नियम न पाळणा-यांच्या संहितांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय मंडळ घेऊ शकते, असे मंडळाचे अध्यक्ष अरुण नलावडे यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले.संहितांना शक्यतो मान्यता देण्याचे धोरण आहे. लेखकाने संहितेवर कष्ट घेतलेले असतात. कात्री लावणे योग्य नाही, हे आम्हाला कळते; पण आवश्यकतेनुसार नको तो भाग काढावा लागतो. यापुढे संहितेला मान्यता दिल्यानंतर मंडळाचे सदस्य किमान पाच प्रयोग पाहतील, असे नलावडे यांनी स्पष्ट केले.------------संहितांना व्हॉट्सअ‍ॅपद्वारे मान्यताग्रामीण भागातल्या लेखक-कलाकारांना संहितेच्या मान्यतेसाठी मुंबईतील कार्यालय गाठणे शक्य नसल्याने व्हॉट्सअ‍ॅपद्वारे तात्पुरती मान्यता देण्यात येत आहे. मंडळाने प्रत्येक जिल्ह्यात प्रतिनिधी नेमले असून त्यांच्याकडे संहिता सादर करता येईल. सदस्याने ती वाचून मंडळाला अभिप्राय कळवल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपद्वारे मान्यतेचे पत्र देण्यात येईल. कायमस्वरुपीचे प्रमाणपत्र घेण्यास कलाकारांना अवधी मिळत असल्याने त्यांची सोय झाली आहे, असे अरुण नलावडे यांनी सांगितले. -----------------------जुन्या संहितांचे जतनमराठी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाकडे १९५४ पासूनच्या ७० हजार नाटकांच्या संहिता आहे. त्यापैकी काही संहितांना वाळवी लागली आहे. पण, या दजेर्दार नाटकाचा भावी पिढ्यांना अभ्यास करता यावा या उद्देशातून संहितांचे स्कॅनिंग करून जतन करण्यात येत असल्याचे अरुण नलावडे यांनी सांगितले. मात्र, काही संहितांचे हक्क लेखकांच्या वारसदारांकडे असल्याने त्या विनापरवानगी प्रयोग करण्यासाठी उपलब्ध होतील, याची खात्री देता येत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PuneपुणेTheatreनाटक