शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मी धमकी दिली, तर कुठेच फिरता येणार नाही; जरांगे पाटलांचा नारायण राणेंना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 07:59 IST

Manoj Jarange Patil on Election: मनोज जरांगे : पाडायचे की लढायचे हे २९ ऑगस्टला ठरणार 

लोकमत न्यूज नेटवर्क वडीगोद्री (जि. जालना) : सप्टेंबर महिन्यात आचारसंहिता लागू शकते. जे उमेदवार असतील, त्यांनी कागदपत्रे काढून ठेवावी. पाडायचे की लढायचे, हे २९ ऑगस्टला ठरणार आहे. आम्ही राज्यातल्या २८८ जागा लढण्याची तयारी करत आहोत, अशी माहिती मनोज जरांगे- पाटील यांनी रविवारी आंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषदेत दिली.

प्रकाश आंबेडकर यांच्या विधानांसंदर्भात जरांगे म्हणाले की, मी सर्वांचा आदर करतो. ते नवीन काय काढायला लागले मला माहीत नाही. ओबीसींवर आमच्यामुळे अन्याय होणार नाही.

नारायण राणे यांना इशाराखा. नारायण राणे यांनी जरांगेंना शनिवारी आव्हान दिले. यावर जरांगे म्हणाले की, त्यांनी मराठवाड्यात येऊ नये, असे आपण कधी बोललेलो नाही. निलेश यांनी त्यांना समजावून सांगावे. मला धमक्या देऊ नका. मी धमकी दिली, तर कुठेच फिरता येणार नाही.

एकदा तुटलेली युती पुन्हा जुळत नसते - आंबेडकरमानोरा (जि. वाशिम) : लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि उद्धवसेना यांची युती संपुष्टात आल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीदरम्यान ही युती पुन्हा जुळणार नाही. एकदा तुटलेली युती पुन्हा जुळत नसते, असे सांगून युतीचा विषय येथेच संपला असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

रविवारी वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे ओबीसी आरक्षण बचाव यात्रा पोहोचली. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, आरक्षण सुरक्षित राहिले पाहिजे. आरक्षण कसे द्यायचे आणि त्यांचे ताट वेगळे कसे ठेवायचे, याचा फॉर्म्युला आमच्याकडे आहे. जोपर्यंत आम्हाला सत्ता देणार नाही, तोपर्यंत आरक्षणाचा हा फॉर्म्युला आम्ही कोणालाही देणार नाही. आरक्षण वाचवायचे असेल तर ओबीसीनी मराठा, कुणबी सोडून फक्त्त ओबीसींच्या उमेदवारास मतदान करण्याची खूणगाठ बांधली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

नेत्यांनी चुकीची वक्तव्ये करू नयेत - अशोक चव्हाण नांदेड : वंचित बहुजन आघाडीच्यावतीने काढण्यात आलेल्या आरक्षण बचाव यात्रेत अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पोहरादेवी येथील सभेत कुणबी आणि मराठा उमेदवाराला ओबीसींनी मतदान करू नये, असे वक्तव्य केले होते. त्यावर, राज्यातील जबाबदार नेत्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करणे, ही दुर्दैवी बाब असल्याची प्रतिक्रिया खासदार अशोक चव्हाण यांनी दिली. चव्हाण म्हणाले, राज्यातील जबाबदार नेत्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करून जातीजातीत, समाजात विशेषतः मराठा समाजात अंतर्गत फूट पाडण्याचे काम करू नये. मराठा समाज एकत्र आहे; परंतु अशा प्रकारच्या वक्तव्यातून मराठा समाजातील अंतर्गत संबंध खराब होण्याचे काम होत असेल तर ते बरोबर नाही. जबाबदार लोकांनी काळजी घेतली पाहिजे. महाराष्ट्रात जातीय सलोखा कायम राहिला पाहिजे.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलNarayan Raneनारायण राणे