शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

दोषी आढळलो, तर वंचितच्या नेत्यांच्या समोर स्वत:चे हात कलम करेन - बच्चू कडू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 07:56 IST

रस्त्याच्या कामात अपहार, राज्यमंत्री कडू यांच्याविरुद्ध गुन्हा

अकोला : रस्ते कामात अपहार केल्याचा आरोप करीत वंचित बहुजन आघाडीने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेनंतर अखेर राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याविरुद्ध बुधवारी उशिरा रात्री सिटी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत वंचितने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडेही तक्रार केली होती.

जिल्हा नियोजन समितीने वार्षिक आराखडा तयार करताना जि.प.कडून ग्रामीण रस्ते दुरुस्ती, नवी कामे, पुलांसाठी प्रस्ताव मागितले हाेते. त्यानुसार  १० मार्च २०२१ रोजी झालेल्या  जि.प.च्या  सर्वसाधारण सभेची मंजुरी घेऊन  प्रस्ताव समितीकडे पाठविण्यात आला होता. मात्र, जि.प.च्या या प्रस्तावांमध्ये परस्पर बदल केले. अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर पालकमंत्री कडू यांनी यंत्रणांचा गैरवापर करून निधी वळविला. शासनाच्या १ कोटी ९५ लाखांचा निधीचा अपहार करण्याच्या उद्देशाने बोगस कागदपत्र तयार केले, असा अशी तक्रार वंचित बहुजन आघाडीने ३ डिसेंबर रोजी सिटी कोतवाली पोलिसांकडे केली होती. परंतु पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यामुळे वंचित तर्फे प्रदेश उपाध्यक्ष डाॅ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १५६ (३) अंतर्गत याचिका न्यायालयात दाखल केली होती.  न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी भादंवि कलम ४०५ (फौजदारीपात्र न्यासभंग, ४०९, लोकसेवकाने फसवणूक करणे), ४२०(फसवणूक), ४६८(खोटे कागदपत्रे तयार करणे), ४७१(खाेट्या कागदपत्रांचा वापर करणे) नुसार गुन्हा दाखल केला. प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकाऱ्यांनी फाैजदारी संहिता प्रकिया १५६ (३) च्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

‘कामात कुठेही अनियमितता नाही’हा चुकीचा निर्णय आहे. या निर्णयाविराेधात सर्वाेच्च न्यायालयापर्यंत दाद मागणार आहाेत, असे स्पष्ट करीत ‘या प्रकरणात आपण दोषी आढळलो तर वंचितच्या कुठल्याही नेत्यांच्या समाेर स्वतःचे हात कलम करेन’, असा पुनरुच्चार पालकमंत्री बच्चू कडू यांनी केला. समाजमाध्यमांवर एक व्हिडिओ प्रसारित करून त्यांनी यावर भाष्य केले आहे.

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडू