शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

कुजबुज! 'त्यांना' एक रुपयाही देणार नाही, भाजपा मंत्र्याला शपथेचा पडला विसर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 06:17 IST

मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष यांनी राणे यांना शपथेची जाणीव करुन द्यावी, अशी कुजबुज आहे.

शपथेचा पडला विसर

राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकासमंत्री नितेश राणे हे प्रथमच मंत्री झाल्याने त्यांना मंत्रिपदाच्या शपथेचा विसर पडला आहे. अन्यथा ‘कुणाला गावाचा विकास हवा असेल तर भाजपमध्ये प्रवेश करा. उबाठा व मविआच्या गावात जिल्हा नियोजन समितीचा एक रुपयाही देणार नाही’, अशी भाषा त्यांनी केली नसती. मंत्रिपदाची शपथ घेताना ‘सर्व तऱ्हेच्या लोकांना निर्भयपणे व निष्पक्षपणे तसेच कुणाविषयी ममत्व अथवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन’, अशी शपथ राणे यांनी घेतली आहे. मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष यांनी राणे यांना शपथेची जाणीव करुन द्यावी, अशी कुजबुज आहे.

वनखात्याला पाणी पाजणार का?

घोडबंदरमधील आदिवासी पाड्यांतील रहिवासी डबक्यातील पाणी पित असल्याचे  वृत्त 'लोकमत'ने प्रसिद्ध केले होते. यावर वनखाते परवानगी देत नसल्याने जलवाहिन्यांचे काम रखडल्याचे पालिका म्हणते. पालिकेचा कारभार नगरविकासमंत्री शिंदेंच्या अखत्यारित आहे. वनखात्याची जबाबदारी भाजपचे गणेश नाईक यांच्याकडे. पाण्यावरून पालिकेने वनखात्यावर खापर फोडले.तर वनखाते परवानगी देवो अथवा न देवो जलवाहिनी टाकणारच, असे एका अभियंत्याने सांगितल्यामुळे त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिंदेंनी वनखात्यावर निशाणा साधल्याने पालिका वनखात्याला पाणी पाजणार का, असे काही जण म्हणत आहेत.

भेटीने मिळते टीकेला बळ!

राज ठाकरे यांनी लोकसभेत महायुतीला पाठिंबा दिला होता. त्याचा फायदा भाजपसह शिंदेसेनेला झाला. याची परतफेड विधानसभेला होईल, असे वाटत असतानाच भाजपचे सहाय्य लाभले. परंतु शिंदेसेनेकडून मनसेविरोधात उमेदवार उभे केले गेले. यात मनसेचे आ. राजू पाटील यांचा पराभव झाला. तेव्हापासून जिल्ह्यात कोणतीही घटना घडताच पाटील हे उपमुख्यमंत्री  शिंदे आणि खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर तोंडसुख घेतात. शिंदे फडणवीस यांच्यावर नाराज आहेत, अशी चर्चा असताना पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि फडणवीस यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. या भेटीगाठींमुळेच पाटील यांना शिंदे पिता-पुत्रांवर टीका करायला बळ मिळत असावे, अशी कुजबुज आहे.

‘त्या’ प्रश्नांवर कधी बोलणार?

कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे शुक्रवारी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाचे महत्त्व सांगण्यासाठी पनवेलमध्ये अवतरले होते. अनेक दिवसांपासून प्रथमच ते शहरात दिसले. पक्षाच्या सोशल मीडियाचे राष्ट्रीय समन्वयक म्हणून ते पत्रकार परिषदेत बोलत होते. परंतु, आमदारकीची दुसरी टर्म भूषविणाऱ्या डावखरे यांनी पदवीधरांसाठी ठोस कार्यक्रम आखावा. आंतरराष्ट्रीय विमानतळ, औद्योगिक कंपन्या तसेच खासगी कंपन्यांमध्ये स्थानिक सुशिक्षितांना रोजगाराविषयी ते कधी बोलतील, पदवीधरांचे आमदार म्हणून रोजगार शिबिरे कधी भरवतील, अशी कुजबुज स्थानिकांत आता सुरू झाली आहे.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे