शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येतल्या राम मंदिरात मिशीवाली मूर्ती बसवा; संभाजी भिडे यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2020 15:29 IST

अयोध्येतल्या राम मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर संभाजी भिडेंची मागणी

मुंबई: राम मंदिराच्या भूमिपूजनाची तयारी अयोध्येत सुरू झाली. ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येत शिलान्यास करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवप्रतिष्ठात हिंदुस्तानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महत्त्वाची मागणी केली आहे. अयोध्येच्या राम मंदिरात बसवण्यात येणारी प्रभू रामांच्या मूर्तीला मिशी असावी, असं मत संभाजी भिडे यांनी व्यक्त केलं आहे.प्रभू राम, लक्ष्मण, हनुमान ही पुरुष दैवतं आहेत. पण राम, लक्ष्मण यांची चित्रं काढताना, त्यांच्या मूर्ती साकारताना चित्रकार, शिल्पकारांनी चूक केली की काय असं माझ्या लक्षात येतं. त्यामुळे राम मंदिरात जी मूर्ती बसवली जाईल, ती मूर्ती मिशीवाली असावी. आतापर्यंत झालेली चूक आपण दुरुस्त करणार नसू, तर मंदिर होऊनही न झाल्यासारखंच आहे, असं संभाजी भिडे म्हणाले. राम मंदिराचा शिलान्यास करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात यावं, असंदेखील संभाजी भिडे यांनी म्हटलं. 'भारत नावाचं राष्ट्र शिवछत्रपतींमुळे अस्तित्वात आहे. त्यामुळे भूमिपूजनाला आपण त्यांची आठवण ठेवू. शिवाजी न होते तो सुन्नत होती सब की, असं कवीभूषण यांनी म्हटलं होतं. त्यामुळे राम मंदिराच्या पायाभरणीवेळी शिवप्रतिमेची पूजा अगत्यानं करावी, असं संभाजी भिडे म्हणाले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनाबद्दल केलेल्या विधानांवरही संभाजी भिडेंनी भाष्य केलं. उद्धव ठाकरे आणि शरद पवार दोन्हीही नेते सन्माननीय आहेत. पण ते गोंधळलेले आहेत, असं मत भिडे यांनी व्यक्त केलं. कोरोनाचं संकट पाहता राम मंदिराचं ई-भूमिपूजन करावं, असं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं होतं. तर राम मंदिरामुळे कोरोना संकट दूर होणार का, असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला होता. 

टॅग्स :Sambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या