शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी शेतमजुरांचा सामूहिक शेतीचा आदर्श; सक्तीचे स्थलांतर रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 00:16 IST

शेतमजूर म्हटले की स्थलांतर हे ओघाने आलेच. वर्षातील किमान ५ महिने उदरनिर्वाहासाठी या शेतमजुरांना आपले गाव सोडून बाहेर जावेच लागते. या सगळ्यात मुलांच्या शाळा सुटतात; महिलांचेही अतोनात हाल होतात. तथापि, कोकणातील माणगावच्या शेतमजुरांनी सामूहिक शेतीचा मार्ग निवडत हे सक्तीचे स्थलांतर रोखले आहे.

- राहुल रनाळकरमुंबई : शेतमजूर म्हटले की स्थलांतर हे ओघाने आलेच. वर्षातील किमान ५ महिने उदरनिर्वाहासाठी या शेतमजुरांना आपले गाव सोडून बाहेर जावेच लागते. या सगळ्यात मुलांच्या शाळा सुटतात; महिलांचेही अतोनात हाल होतात. तथापि, कोकणातील माणगावच्या शेतमजुरांनी सामूहिक शेतीचा मार्ग निवडत हे सक्तीचे स्थलांतर रोखले आहे. सध्या या शेतमजुरांच्या समूहावर संपूर्ण कोकणातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.इंदापूरपासून जवळ असलेल्या निवी मुठवली येथील आदिवासी वाडीवर हा प्रयोग गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. या आदिवासी शेतमजूर कुटुंबातील सगळ्या सदस्यांनी मिळून सामूहिक शेतीचा प्रयोग यशस्वी केला. माणगाव येथील सर्वविकास दीप या संस्थेच्या माध्यमातून या आदिवासी शेतमजुरांना दिलेले मार्गदर्शन सामूहिक शेतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरले. तीन वर्षांपासून माणगावमधील काही भूमिहीन शेतकऱ्यांना वर्षभर रोजीरोटी मिळावी, यासाठी ही संस्था कार्यरत आहे. ज्या जमिनींवर साधारण नोव्हेंबरच्या शेवटापर्यंत किंवा डिसेंबरच्या सुरुवातीपर्यंत भात पीक घेतले जाते, त्या जमिनी नंतर मेपर्यंत पिकाविना पडून असतात. अशा जमीन मालकांशी संस्थेच्या पुढाकाराने या शेतमजुरांच्या समूहानं करार केले. त्यानंतर डिसेंबर ते मेपर्यंतच्या काळात या जमिनीवर कारली, कलिंगड, भाज्या अशी उत्पादने घेण्यात आली. गेल्या वर्षी ४ टन कारली तर ३ टन कलिंगडांचे उत्पादन या शेतमजुरांनी घेतले. संस्थेच्या माध्यमातूनच वाशीतील व्यापाºयांशी बोलणी करून उत्पादित झालेला हा माल मुंबईत आणण्यात आला. स्थानिक पातळीवर उपजिविका निर्माण झाल्याने या शेतमजुरांचे स्थलांतर थांबले. मुलांच्या शाळा नियमित राहिल्या; घरातील महिलांचीही ससेहोलपट थांबली. शिवाय संपूर्ण कुटुंबाला चांगले उत्पन्न मिळू लागले. रोहा कृषी महाविद्यालयातून मोफत बियाणे मिळवून देण्यात संस्थेला यश आले. या आदिवासी शेतमजुरांच्या बचत गटाने गेल्या वर्षी तब्बल साडेसात ते आठ लाखांचा फायदा मिळविला. प्रत्येक कुटुंबाला साधारण ३ ते ४ महिन्यांच्या कालावधीत एक लाखाचे उत्पन्न मिळाले. शेती करताना सेंद्रिय खतांचा अधिकाधिक वापर केला जातो. या बचतगटातील शेतमजुरांना बायो-कंपोस्ट खत वापरण्याचे तंत्र शिकविले जाते. सल्फेटसारखे कमी रसायने असलेले खत वापरण्यासाठीही संस्थेच्या माध्यमातून प्रवृत्त केले जाते. डिसेंबर ते मे या काळात बचत गटातील शेतमजूर हे पिकाचे मालक असतात, एकदा का पीक काढले गेले की ते पुन्हा पुढच्या हंगामासाठी भात शेतीसाठी काम करू लागतात. सध्या बचत गटाच्या माध्यमातून १८ कुटुंबांतील शेतमजूर १२ एकर शेतीवर हा सामूहिक शेतीचा प्रयोग करीत आहेत.सर्वविकास दीप संस्थेची २० सदस्यांची टीम आहे. दहा वर्षांपासून आम्ही माणगावमध्ये कार्यरत आहोत. आमच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या बचत गटातील प्रत्येक कुटुंबाला सध्या एक लाखाचे उत्पन्न मिळते. पण आम्ही एवढ्यावर नक्कीच समाधानी नाही. या कुटुंबांचे उत्पन्न दीड ते दोन लाखांपर्यंत नेण्याचे आमचे लक्ष्य आहे.- रिची (भाऊ) माणगावकर, सर्वविकास दीप संस्था

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी