शहरं
Join us  
Trending Stories
1
२००३ मध्ये भारताच्या हातातला वर्ल्डकप हिसकावणारा फलंदाज कोमामध्ये; ऑस्ट्रेलियाचा स्फोटक दिग्गज मृत्यूशी देतोय झुंज
2
पाकिस्तानात मोठी खळबळ! लष्कर मुख्यालयात लष्करप्रमुखांच्या मुलीचा निकाह; फोटो का आले नाहीत समोर?
3
'इंडिया आघाडी' तुटणार? बिहारमधील पराभवानंतर, काँग्रेसवर एकट्याने निवडणूक लढण्याचा वाढला दबाव
4
टार्गेट पूर्ण...! केंद्र सरकारने 'या' इलेक्ट्रिक वाहनांवरील सबसिडी बंद केली; टू-व्हीलर, कारही रांगेत...
5
भारत-पाक संघर्षात चीनची उडी! "आम्हीच केली मध्यस्थी"; ट्रम्प यांच्यानंतर आता 'ड्रॅगन'चा नवा दावा
6
निवडणुकीला समोरे जाण्यापूर्वी योगी आदित्यनाथ अखेरचा डाव टाकणार; संक्रांतीनंतर अनेक मंत्र्यांना डच्चू देणार, मंत्रिमंडळाचा विस्तार करणार...
7
गुड न्यूज! रेल्वे तिकिटावर ३ टक्के सवलत; प्रवाशांना आर्थिक दिलासा
8
Union Bank of India मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,२३९ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
9
भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था; जपानला टाकले मागे; केंद्र सरकारची अधिकृत घोषणा
10
सैन्य भरतीची तयारी करत होता, पण प्रेमाच्या जाळ्यात अडकला; प्रेयसीच्या एका फोन कॉलने घात केला!
11
नाराज निष्ठावंतांचा उद्रेक, थेट नेत्यांनाच शिव्यांची लाखोली! वर्षानुवर्षे पक्षनिष्ठा जपणारे, सतरंज्या उचलणारे भाजप कार्यकर्ते भडकले
12
नातेवाईकच उदंड झाले कार्यकर्ते वाऱ्यावर उडाले, ३० नेत्यांसह ११६ नातेवाईक निवडणूक रिंगणात
13
आजचे राशीभविष्य ३१ डिसेंबर २०२५ : सरत्या वर्षाचा शेवट कोणासाठी गोड होणार? कसा असेल आजचा दिवस...
14
तिसरं महायुद्ध अन् मोठी आपत्ती...! 2026 साठी बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
15
सावधान! मोबाईलमध्ये 'हे' गाणे आढळल्यास थेट तुरुंगवास; चीनने लादले कडक निर्बंध
16
KDMC: मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?
17
Nagpur: आईच्या अंत्यसंस्कारादरम्यान मिळाला एबी फॉर्म; काळजावर दगड ठेवून गाठलं निवडणूक कार्यालय!
18
Nagpur: शिंदेसेनेला आठ जागा, पण सहा उमेदवार भाजपचेच; अखेरच्या दिवशी संपविला सस्पेन्स
19
वर्षाचा शेवटही एकदम झक्कास! भारतीय महिला संघाने ५-० अशा मालिका विजयासह श्रीलंकेचा उडवला धुव्वा
20
Nagpur: भाजपला बालेकिल्ल्यातच खिंडार! नागपूरमध्ये एकसोबत ४२ कार्यकर्त्यांचा राजीनामा
Daily Top 2Weekly Top 5

‘अ‍ॅम्फिबियस बस’मध्ये मद्य पुरविण्याचा विचार!

By admin | Updated: July 5, 2016 01:31 IST

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी रस्त्यासोबतच पाण्यावरही धावू शकणारी ‘अ‍ॅम्फिबियस’(उभयचर) बस मुंबईत चालविण्याचा निर्णय याआधीच घेण्यात आला होता. आता या प्रवासाचा

मुंबई : पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी रस्त्यासोबतच पाण्यावरही धावू शकणारी ‘अ‍ॅम्फिबियस’(उभयचर) बस मुंबईत चालविण्याचा निर्णय याआधीच घेण्यात आला होता. आता या प्रवासाचा आनंद वाढविण्यासाठी बसमध्ये अन्य खाद्यपदार्थांसोबतच वाइन व बीअरही पुरविण्याचा विचार एमटीडीसीकडून (महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ) केला जात आहे. सार्वजनिक रस्ते वाहतुकीत मद्य पुरविण्याचा हा देशातील पहिला प्रयोग असल्याचे मानले जात आहे.मुंबईत मोठ्या प्रमाणात विदेशी पर्यटक येतात. मात्र त्यांना चौपाट्यांव्यतिरिक्त अन्य फार पर्याय उपलब्ध नाहीत. या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी एमटीडीसीने जेएनपीटीमार्फत (जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट) अ‍ॅम्फिबियस बसची नवी संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला. परदेशातील अशा बसना पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत बसचे काम पूर्ण होऊन ती मुंबईत दाखल होण्याची शक्यता असल्याचे एमटीडीसीतील सूत्रांकडून सांगण्यात आले. पर्यटकांना या बसमधून दोन तास प्रवास घडवला जाणार आहे. या प्रवासात खाद्यपदार्थ आणि मद्य पुरविण्याचा विचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)चार कोटींची बसया बसमधून प्रवासासाठी प्रतिव्यक्ती ६०० रुपये किंवा त्यापेक्षाही अधिक शुल्क आकारण्याचा विचार केला जात आहे. या ५० आसनी बसची किंमत ४ कोटी असून, ती प्रामुख्याने दक्षिण मुंबईत चालविण्यात येणार आहे.