शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

Deepak Kesarkar : ५० खोकेच काय साधे ५० रुपये जरी घेतले असतील तरी राजीनामा देईन - दीपक केसरकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 13:23 IST

Deepak Kesarkar : "खाऊन खाऊन पन्नास खोके, माजलेत बोके माजलेत बोके..." अशा घोषणा देत विरोधकांनी शिंदे गटाला टोला लगावला. यावर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी उत्तर दिलं आहे.

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष आणि महाविकास आघाडीमध्ये होणारी घुसमट यामुळे बंडखोरी केली. आमदारांना घेऊन ते सूरतला गेले. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी कारभार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अखेरीस शिवसेनेचे सुमारे ५० आमदार आणि काही अपक्ष आमदार यांच्या साथीने शिंदे गटाने भाजपासोबत महाराष्ट्रात सत्तास्थापना केली. या सर्व आमदारांना भाजपाकडून प्रत्येकी ५० कोटी रूपये देण्यात आला आरोप विरोधक सातत्याने करत आहेत. विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर उभे राहून घोषणाबाजी केली आहे. 

"खाऊन खाऊन पन्नास खोके, माजलेत बोके माजलेत बोके..." अशा घोषणा देत विरोधकांनी शिंदे गटाला टोला लगावला. यावर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak kesarkar) यांनी उत्तर दिलं आहे. ५० खोके काय ५० रुपये जरी घेतले असतील तर राजीनामा देईल असं केसरकर यांनी म्हटलं आहे. "सत्तेसाठी कोणी काही करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. पायऱ्यांवर बसून आंदोलन करतात, घोषणा देतात. तो मुद्दा मी विधान परिषदेत खोडून काढला."

"५० खोकेचा अर्थ ५० कोटी असा असतो. त्यांना मी सांगितलं साधे ५० रुपये जरी मी घेतलेले दाखवलेत तरी माझ्या पदाचा राजीनामा देईन. आम्ही मनापासून काम करणारे कार्यकर्ते असतो. म्हणून मी आव्हान केलं की ५० किंवा ५० हजार घेतलेलं सिद्ध करून दाखवा मी राजीनामा देतो. मी ५० आमदारांचं नेतृत्व करतो. आम्ही सरकार म्हणून जनतेतून निवडून येतो. जर त्यांचे प्रश्न पूर्ण केले जात नसतील तर उठाव होतो. आम्ही प्रामाणिक आहोत म्हणूनच उघडपणे हे सर्व बोलू शकतो" असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे. 

जोरदार राडा! शिंदे गट-राष्ट्रवादीचे आमदार भिडले; अमोल मिटकरींनी सांगितले नेमके काय घडले? 

शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी एकमेकांना भिडले. यावेळी दोन्ही गटात जोरदार धक्काबुक्कीही झाली. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, प्रताप सरनाईक, शहाजी बापू पाटील यांनी मध्यस्थी करून दोन्ही गटांना बाजुला करण्याचा प्रयत्न केला. यानंतर मिटकरी यांनी शिवसेनेच्या आमदारांवर गंभीर आरोप केला. शिवसेनेच्या महेश शिंदे यांनी धक्काबुक्की केली, घाणेरडी शिवीगाळ केली, असे ते म्हणाले. तसेच यानंतर मिटकरींनी शिंदे यांची तक्रार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. 

शिंदे गटाच्या आमदारांनी शिवीगाळ केली, धक्काबुक्की केली. यामुळे विधीमंडळाच्या पायऱ्यांवर गोंधळ उडाला. अखेर अजित पवार आले आणि आम्हाला बाजुला होऊया म्हणाले. त्यामुळे आम्ही बाजुला झालो असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. तसेच पन्नास खोके एकदम ओके हा नारा दिल्याने शिंदे गटातील आमदारांना झोंबल्याने त्यानी हे कृत्य केले आहे. आम्ही त्यांना डिवचले नाही त्यांनीच आम्हाला डिवचले आहे. धक्काबुक्की करणारे आमदार कोण होते त्यांना मी ओळखत नाही. आम्हाला अजितदादा पवार यांनी सभागृहाच्या पायऱ्यांवर बोलावले होते त्यानुसार आम्ही आंदोलनासाठी आलो होते. परंतु जे काही अशोभनीय वर्तन केले आहे ते संविधानाला धरून नाही असं मिटकरींनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण