शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

Narayan Rane: सर्व बाहेर काढणार, कोणालाही सोडणार नाही; नारायण राणेंचा शिवसेनेला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 07:42 IST

Narayan Rane Warning to Shiv sena: पंतप्रधान मोदी यांच्या आदेशानुसार जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे त्यांच्या नशिबी नाही, असा टोला त्यांनी नाव न घेता शिवसेनेला लगावला.

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : गेला आठवडाभर बोलतोय. त्यामुळे आवाज बसला आहे. तो बरा झाल्यावर पुन्हा बोलणार आहे. मागची सर्व प्रकरणे बाहेर काढणार. मग कोणालाही साेडणार नाही. काय करायचे असेल ते करा, असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेला दिला.

शहरातील भाजप कार्यालयात पक्षातर्फे आयोजित सत्कार समारंभाच्या वेळी ते बोलत होते. आपल्याच वहिनीवर ॲसिड फेकायला कोणी सांगितले, रमेश मोरे यांची हत्या कशी झाली, यासह अनेक गोष्टी आपण बाहेर काढणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

पंतप्रधान मोदी यांच्या आदेशानुसार जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे त्यांच्या नशिबी नाही, असा टोला त्यांनी नाव न घेता शिवसेनेला लगावला. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. मी काय म्हटले? त्या वेळेला मी तेथे असतो तर आवाज आलाच असता, यात गुन्हा काय आहे, असा प्रश्न त्यांनी केला. जसे एखाद्या दरोडेखोराला अटक करतात, तशी अटक एका केंद्रीय मंत्र्याला केली. काय त्यांचा पराक्रम आहे. काय म्हणायचं याला? अशा शब्दांत त्यांनी राज्य शासनाची खिल्ली उडवली. या वेळी त्यांनी आपल्या घरावर हल्ला करणाऱ्यांवरही टीका केली. 

यात्रा नाही, केवळ बैठकारत्नागिरीत मनाई आदेश जारी असल्याने भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेला परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे या दौऱ्यात जनआशीर्वाद यात्रेचे वाहन कोठेही नव्हते. परवानगी नाकारल्याने राणे यांनी महापुरुषांच्या पुतळ्यांवर पुष्पवृष्टी केल्यानंतर गोळप, भाजप कार्यालय अशा दोनच बैठका घेतल्या. कोणताही जाहीर कार्यक्रम केला गेला नाही. 

पैसे जमवणे एवढाच शिवसेनेचा कार्यक्रमnदेशातील सर्वांत मोठा भ्रष्टाचार महाराष्ट्रात सुरू आहे. पैसे जमवणे एवढाच शिवसेनेचा कार्यक्रम आहे आणि पैसे आणून द्या, एवढीच त्यांची भूमिका आहे, अशी टीका राणे यांनी पत्रकार परिषदेत केली.nसत्तेची मस्ती दाखवण्याची काही जणांची प्रवृत्ती आहे. आम्ही कायम विरोधी पक्षात राहण्यासाठी जन्माला आलेलो नाही. केंद्रात सत्तेत आहोत. भविष्यात राज्यातही सत्तेत येऊ. त्यामुळे पोलीस अधिकारी आणि प्रशासनाने कोणाचेही आदेश आले, दबाव आला तरी कायदा साेडून वागू नये, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे