शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Breaking; मी विधानसभा निवडणूक लढविणार नाही; गणपतराव देशमुखांचे स्पष्टीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 13:16 IST

जनतेच्या समस्यांची जाणीव असणारा उमेदवार देणार : गणपतराव देशमुख

ठळक मुद्दे१९६२ पासून सांगोला तालुक्यातील जनतेने मला सेवा करण्याची संधी दिली - आ.गणपतराव देशमुखआता शरीर साथ देत नसल्याने २०१९ च्या निवडणुकीत शेकापकडून नव्या उमेदवाराला संधी देण्याची वेळ आली - आ.गणपतराव देशमुखसंपूर्ण तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाची संघटना मजबूत आहे - आ.गणपतराव देशमुख

सांगोला  : पन्नास वर्षांहून अधिक काळ जनतेने मला लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिली़ त्याबद्दल जनतेचे आभार. परंतु २०१९ च्या निवडणुकीतही शेतकरी कामगार पक्ष देईल तो उमेदवार मोठ्या मताधिक्क्यांनी विधानसभेत पाठवून पुन्हा एकदा सांगोला हा शेतकरी कामगार पक्षाचा अभेद्य बालेकिल्ला आहे हे सिद्ध करून दाखवू असे आवाहन आ.गणपतराव देशमुख यांनी केले आहे.

सन २०१९ च्या निवडणुकीत शेकापचा नवीन कार्यक्षम आणि सर्वसामान्य जनतेच्या समस्यांची जाणीव असणारा  उमेदवार मी ठरविणार आहे. उमेदवारांच्या नावावर एकमत न झाल्यास तालुक्यातील प्रत्येक गावातून शेतकरी कामगार पक्षाच्या एका कार्यकर्त्यांचे मतदान घेऊन शेकापचा नवीन उमेदवार ठरविणार असल्याचे आ.देशमुख यांनी जाहीर केले. कोळा येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी शेकापचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 ते पुढे म्हणाले, १९६२ पासून सांगोला तालुक्यातील जनतेने मला सेवा करण्याची संधी दिली. आता शरीर साथ देत नसल्याने २०१९ च्या निवडणुकीत शेकापकडून नव्या उमेदवाराला संधी देण्याची वेळ आली आहे. संपूर्ण तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाची संघटना मजबूत आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेबद्दल बोलत असताना आजपर्यंतच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस या मित्रपक्षाने शेकापला मदत केल्याचे गणपतराव देशमुख यांनी स्पष्ट केले़  १९५२ पासून सांगोला हा शेकापचाच बालेकिल्ला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस २०१९ च्या निवडणुकीत शेकापकडे उमेदवारीची मागणी करत असली तरी याबाबत मी वैयक्तिक निर्णय घेऊ शकत नाही. शेकापचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते राष्ट्रवादीला उमेदवारी द्यायची की नाही? याचा निर्णय घेतील.

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकGanpatrao Deshmukhगणपतराव देशमुख