शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

मी गुन्ह्याची कबुली देणार नाही! टकलाचा कोर्टात अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 03:49 IST

गुन्ह्याची कबुली देणार नसल्याचे १९९३च्या साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य सूत्रधार मन्सुर मोहम्मद फारुख उर्फ फारुख टकला (५७) याने गुरुवारी टाडा कोर्टात केलेल्या अर्जात म्हटले आहे. घरगुती जेवण, योग्य उपचार, वकिलांसोबत १० मिनिटे बोलणे, कुटुंबाची भेट अशा स्वरुपाच्या त्याने दाखल केलेल्या ६ अर्जांपैकी एक गुरुवारीच मान्य करण्यात आला होता.

मुंबई  - गुन्ह्याची कबुली देणार नसल्याचे १९९३च्या साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य सूत्रधार मन्सुर मोहम्मद फारुख उर्फ फारुख टकला (५७) याने गुरुवारी टाडा कोर्टात केलेल्या अर्जात म्हटले आहे. घरगुती जेवण, योग्य उपचार, वकिलांसोबत १० मिनिटे बोलणे, कुटुंबाची भेट अशा स्वरुपाच्या त्याने दाखल केलेल्या ६ अर्जांपैकी एक गुरुवारीच मान्य करण्यात आला होता. उर्वरित ५ अर्जांवर टाडा कोर्टात शुक्रवारी सुनावणी होती. मात्र ती पुढे ढकलली असून सोमवारी होणार आहे.२५ वर्षांनी तपास यंत्रणेच्या हाती लागलेला टकला हा १९९३च्या साखळी बॉम्बस्फोटाच्या कटातील मुख्य सूत्रधार आहे. दाऊदचा उजवा हात म्हणूनही त्याची ओळख आहे. गुरुवारी त्याला दिल्लीतून अटक केल्यानंतर तो १९ मार्चपर्यंत सीबीआय कोठडीत आहे. गुरुवारी त्याने टाडा न्यायालयाकडे ६ अर्ज केले होते. यापैकी वकिलांसोबत बोलू देण्याचा अर्ज मान्य करण्यात आला होता. उर्वरित पाच अर्जांवर शुक्रवारी सुनावणी होणार होती. त्यासाठी त्याला टाडा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्याचा भाऊ अहमद लंगडाही तेथे हजर होता.देशाच्या सुरक्षेला धोका पोहचेल असे कोणतेही कृत्य मी केलेले नाही. देशातील तसेच विदेशातील कोणत्याही गुन्हेगारी कारवाया करणा-या टोळीशी मी संबंधीत नसून कोणत्याही तपास यंत्रणा, न्यायालयासमोर जबाब दिलेला नाही, असे त्याचे म्हणणे आहे.टकलाने गुरुवारी न्यायालयात दिलेल्या अर्जांत, कोणत्याही तपास अधिकारी अथवा न्यायालयासमोर गुन्ह्याची कबुली देण्यासाठी तयार नसल्याचे सांगितले. तसेच कोणत्याही प्रकारच्या पुराव्यांसाठी जप्ती करू देणार नसल्याचेही स्पष्ट केले. जबाब नोंदविताना वकिलांना समोर ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही त्याने केली आहे. त्याच्या अर्जांवरील सुनावणी सोमवारीहोणार आहे.

टॅग्स :Farooq Taklaफारुख टकलाCrimeगुन्हा