शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

एकाच या जन्मी जणू फिरूनी नवे जन्मेन मी...

By admin | Updated: November 28, 2014 01:06 IST

संसाराच्या वेलीवर एक सुंदर फूल उमलले. सारी स्वप्ने मातेच्या डोळ्यात होतीच. तिच्या इवल्याशा पावलांत मातेचे जगच सामावले होते. पण नियतीने क्रूर डाव खेळला. जन्माला आल्यावर डोळे उघडण्यापूर्वीच

सहा दिवसांच्या चिमुकलीचे नेत्रदान : जग पाहण्याआधीच निरोपनागपूर : संसाराच्या वेलीवर एक सुंदर फूल उमलले. सारी स्वप्ने मातेच्या डोळ्यात होतीच. तिच्या इवल्याशा पावलांत मातेचे जगच सामावले होते. पण नियतीने क्रूर डाव खेळला. जन्माला आल्यावर डोळे उघडण्यापूर्वीच त्या चिमुकलीला या जगाचा निरोप घ्यावा लागला. तिच्या डोळ्यातल्या स्वप्नांना आकारच घेता आला नाही. आपल्या जन्मदात्या मातेला अन् पित्यालाही न पाहता ती वयाच्या अवघ्या सहाव्या दिवशीच निघून गेली. आता तिच्या आई-वडिलांचे डोळे डबडबले आहेत. त्यांचे हे पहिलेच अपत्य होते. आपल्या अपत्याचे कलेवर वाहून नेण्यासारखे मोठे दु:ख नाही...पण त्या चिमुकलीच्या वडिलांनी मात्र तिचे डोळे दान करण्याचा निर्णय घेतला. अवघ्या सहा दिवसांच्या चिमुकलीचे डोळे दान करण्याचा हा जगातील कदाचित पहिलाच प्रसंग असावा. ती चिमुकली आता नाही, पण तिचे डोळे हे जग पाहणार आहेत. आपल्या माता-पित्याला पाहण्यासाठी तिचे डोळेही आतूर असावेत. तिचे डोळे कुणाच्या तरी शरीरातून हे जग पाहतील. ‘एकाच या जन्मी जणू...फिरूनी नवे जन्मेन मी’ हीच भावना त्या चिमुकलीचीही असावी.सारेच सुरळीत होते. स्वाभाविकपणे विवाहानंतर घरात एका नवीन पाहुण्याची चाहूल लागली आणि सारे घरच आनंदाने सैरभैर झाले. दीपक सुरेश नरांजे आणि दीक्षापाली यांना तर मायबाप होण्याचा आनंद आयुष्य व्यापणाराच होता. मातेचे डोहाळे, गंमत, मजा आणि बाळाच्या जन्माची प्रतीक्षा. हळूहळू दिवस जवळ आले आणि नव्या जीवाच्या स्वागतासाठी सारेच उत्सुक झाले. दीक्षापाली यांना ५ नोव्हेंबर रोजी शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. माता आणि बाळाची तपासणीही करण्यात आली. सर्व स्थिती योग्य होत्या आणि बाळही निरोगी होते. १९ नोव्हेंबरला डॉक्टरांनी सीझर करावे लागेल, अशी सूचना दिली. पण २० तारखेला काही कारणाने सीझर करण्याची गरज नसल्याचे सांगण्यात आले. २१ तारखेला सकाळी ५ वाजून १७ मिनिटांनी बाळाचा जन्म झाला. पण जन्म झाल्यावर बाळ रडलेच नाही. बाळ रडले नाही म्हणून त्वरित बाळाला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. एकीकडे बाळंतपणाच्या कळा सोसल्याने मातेची शक्ती क्षीण झाली होती. ती जवळपास चार दिवस बेशुद्धावस्थेतच होती. बाळ अतिदक्षता विभागात आणि माता बेशुद्धावस्थेत. मातेचे दूध पिण्याचीही बाळाची शक्ती नव्हती.