शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

गुवाहाटीहून मला परत यायचं होतं, पण...; बच्चू कडू यांनी स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2022 18:23 IST

१ नोव्हेंबरनंतर काय करणार हे आता सांगू शकत नाही. काही गोष्टीसाठी वाट पाहावी लागते. आरोप होत असतील तर ठोस बोलले पाहिजे असा इशारा बच्चू कडूंनी दिला.

मुंबई - आम्ही गुवाहाटीत गेल्यानंतर आमच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. आम्ही काहीतरी वाईट करून आलो असं वाटायला लागलं. मी गुवाहाटीला जाऊ नये असं बऱ्याच लोकांना वाटत होते. मला परत यायचं होतं पण आलेला माणूस जाऊन द्यायचा नाही अशी ती वेळ होती. त्याला पर्याय नव्हता असं सांगत बच्चू कडू यांनी सत्तांतराच्या घडामोडीवर भाष्य केले आहे. 

बच्चू कडू म्हणाले की, एकनाथ शिंदे हा मैदानावरचा कार्यकर्ता, रात्री २ वाजता वर्षा बंगल्यावर दीड हजार लोकं असतात. ही चांगली बाब आहे. मी दिव्यांगांसाठी काम केले. उद्धव ठाकरेंच्या शेजारचे लोक, अधिकारी होते ते काम करत नव्हते. दिव्यांगाबाबत दीड वर्ष बैठकही लावली नव्हती. उद्धव ठाकरेंबद्दल आस्था आहे. परंतु ते मातोश्रीवर जेवढे मजबूत होते तेवढे वर्षावर नव्हते. सत्तेत गेल्यावर काही महत्त्वाचे विषय मार्गी लागणं गरजेचे असते पण ते झाले नाही. ही बाब मनाला खटकत होती. त्याचसोबत मी एकनाथ शिंदे यांच्यामुळेच शिवसेनेला पाठिंबा दिला होता. मतदारसंघातील प्रकल्प अर्धवट पडले आहेत. सत्ता किती महत्त्वाची सगळ्यांना माहिती आहे. किती वर्ष सत्तेच्या बाहेर राहणार ही कार्यकर्त्यांची भूमिका होती, सत्ता मंत्री म्हणून पाहिली पाहिजे अशी भावना होती. मतदारसंघातील विकासकामांना चालना देता आली असं त्यांनी सांगितले. 

तसेच रवी राणाने जे शब्द वापरले, तोडपाणी करतो, गुवाहाटीला पैशासाठी गेला. आयुष्यात पैशासाठी काम केले नाही. माझी संपत्ती व्हावी अशी माझी भूमिका नव्हती. विरोधकांचे आरोप होते. पण सत्तेतला माणूस जेव्हा असे आरोप करतो त्यावर शिक्कामोर्तब होतो. माझे नाव घेऊन आरोप केले ते मला खटकले. वेदना देणाऱ्या गोष्टी होत्या. राणांमागे कोण आहे ते शोधणं गरजेचे आहे. पुराव्याशिवाय बोलू नये. आम्ही २०-२५ वर्ष काम करतोय. जात-पात-धर्म राजकारणात आणलं नाही. तत्व, रणनीती राजकारणात जपली असं सांगत बच्चू कडू यांनी राणांवर प्रहार केला. 

...असं वाटलं नव्हतं. काही झाले असते तर प्रहार पक्षात शिंदे गट आला असता. सहजपणे मी मुख्यमंत्री आमच्या पक्षाचा होईल असं बोलून गेलो. पण असं काही मनात नव्हतं. मी मंत्रिपदातून इतका काळ बाहेर राहीन वाटलं नव्हतं. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळेल वाटलं होते. पण सगळ्या गोष्टींचे राजकारणात पालन होत नाही. काही डावपेच असतात. मी वयाच्या आठवी-नववीपासून आंदोलन करतोय. २०० पेक्षा जास्त गुन्हे दाखल झालेत. कार्यकर्ते थकले आता. शेतकरी पक्षांत विभागला आहे. या चळवळीला पुढे घेऊन जाण्यासाठी पद महत्त्वाचं असते. लोकाभिमुख कारभार करता येईल यासाठी पद हवं असते असं सांगत मंत्रिपदाची अपेक्षा कडू यांनी व्यक्त केली. 

खोकेवाला आमदार हा आरोप वेदनादायी माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला. खोकेवाले आमदार असा आरोप केला जातो. मला अपंगाचा कैवारी म्हणायचे त्यात खोके शब्द आला ते वेदना देणारं आहे. राणा राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आला आणि भाजपाला पाठिंबा दिला तेव्हा आम्ही म्हणायचं का खोके घेतले. राजकारणात अशा गोष्टी होत असतात. छत्रपती शिवरायांपासून काही तडजोडीचं राजकारण होत होतं. देवेंद्र फडणवीस अभ्यासू व्यक्ती, एकनाथ शिंदे ग्राऊंड पातळीवर जाऊन काम करतायेत. त्यामुळे ही जोडी एकत्र टिकली तर अनेक कामं मार्गी लागतील. गुवाहाटी ही दुय्यम गोष्ट आहे. ती राजकारणातील रणनीती होती हे लोकांच्या मनातून बाहेर पडलं पाहिजे असं कडू यांनी म्हटलं. ABP माझा कट्टावर ते बोलत होते. 

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसही अडचणीत१ नोव्हेंबरनंतर काय करणार हे आता सांगू शकत नाही. काही गोष्टीसाठी वाट पाहावी लागते. आरोप होत असतील तर ठोस बोलले पाहिजे. राणावर कारवाई व्हावी एवढा तो मोठा नाही. आम्ही तळागाळातून इथपर्यंत पोहचलोय. आम्ही राजकारणात सहज आलो नाही. पैसे कुणाकडून घेतले त्याचे उत्तर आहे का? सत्ता अशीच स्थापन होत असेल तर लोकशाहीचं पतन झालं हा आरोप खराच आहे. माझ्यावर आरोप केले त्यामुळे मी एकटा नाही तर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसही अडचणीत आलेत असं कडू यांनी सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूRavi Ranaरवी राणाEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस