शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

एसटी कर्मचाऱ्यांकडून मी पैसे घेतले पण...; गुणरत्न सदावर्ते यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 11:33 IST

गिरगाव न्यायालयाच्या आदेशाने सदावर्ते यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकील प्रदीप घरत म्हणाले, सदावर्ते यांनी एस.टी. कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतले आणि त्या पैशांतून मालमत्ता, गाडी खरेदी केली.

मुंबई :  सिल्व्हर ओक हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांना गिरगाव न्यायालयाने बुधवारी पुन्हा १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. स्वतःची बाजू मांडताना सदावर्ते यांनी एस.टी. कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याची कबुली देत, एस.टी. कर्मचाऱ्यांकडून ३०० ते ५०० रुपये घेतले पण ते फक्त कोर्ट कामकाजासाठी घेतले. एवढे कमी पैसे कोणता वकील घेतो हे सांगा? असाही सवालही त्यांनी केला. तसेच नोटा मोजण्याचे मशीनही तीन हजार रुपयांत खरेदी केल्याचे नमूद केले. गिरगाव न्यायालयाच्या आदेशाने सदावर्ते यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकील प्रदीप घरत म्हणाले, सदावर्ते यांनी एस.टी. कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतले आणि त्या पैशांतून मालमत्ता, गाडी खरेदी केली. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी केली. तसेच सदावर्ते यांच्या घराच्या झडतीत महत्त्वाच्या गोष्टी सापडल्या आहेत. कागदपत्रे, रजिस्टर आणि नोटा मोजण्याचे मशीन सापडले आहे. प्रदीप घरत यांनी हर्षद मेहता प्रकरणाचा निकाल सदावर्ते प्रकरणात ‘रेफरन्स’  म्हणून वाचून दाखविला.त्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी स्वत: युक्तिवाद करीत आपली बाजू मांडली. सदावर्ते यांच्या बाजूने  कोर्टात कुठलाच वकील आला नसल्याने त्यांनीच आपली बाजू मांडली. गुणरत्न सदावर्ते यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, पोलीस हे दाखविण्याचा प्रयत्न करीत आहे की, हा एक मोठा घोेटाळा आहे. मी ३०० ते ५०० रुपये घेतले पण ते फक्त कोर्ट कामकाजासाठी घेतले. एवढे कमी पैसे कोणता वकील घेतो, हे सांगावे? कागदपत्र जप्त केले, ते वकीलपत्र आहे. माझ्या प्रकरणात हर्षद मेहता प्रकरणाचा दाखला दिला गेला, हे दुःखद आहे. माझे सासू-सासरे स्वातंत्र्यसैनिक आहेत. गाडी घेतली तिची नोंद आरटीओमध्ये आहे. गाडी घेण्याकरिता पैसे दिले ते ऑनलाईन दिल्याचे पुरावे आहेत. २०१४ ची जुनी गाडी मी खरेदी केली आहे. नोटा मोजण्याची मशीन तीन हजारांना घेतली आहे. आपण मुंबईत राहतो, असेही त्यांनी नमूद केले. दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर महानगर न्यायदंडाधिकारी नदीम पटेल यांनी सदावर्ते यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. 

‘मी कष्टकऱ्यांचा वकील आहे’कोर्टातून बाहेर पडताना सदावर्ते यांनी सरकारी वकील आणि पत्रकारांकडे पाहून, ‘मी कष्टकऱ्यांचा वकील आहे.  हर्षद मेहता नाही. मी हर्षद मेहता होऊ शकत नाही’, असे म्हटले. 

 

टॅग्स :ST Strikeएसटी संपPoliceपोलिसCourtन्यायालय