शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

मी स्वत:ला मुख्यमंत्री समजतो, मंत्री काय करता?; शिंदे गटाच्या आमदाराचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2022 10:11 IST

संधी मिळाली तर नक्कीच त्याचं सोने करेन. मला जो विभाग मिळेल त्यामाध्यमातून राज्याच्या हिताचे निर्णय घेईन पण मी नाराज नाही एवढं नक्की असा खुलासा त्यांनी केला. 

मुंबई - शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी अनेक आमदार इच्छुक आहेत. पहिल्या विस्तारात स्थान न मिळालेल्या नेत्यांनी दुसऱ्या विस्ताराकडे आस लावून बसले आहेत. मात्र मंत्रिमंडळ कधी होणार याबाबत अद्यापही ठोस सांगितले जात नाही. त्यातच मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार रखडल्याने शिंदे गटातील आमदार नाराज असल्याचं बोललं जात आहे. आमदार किशोर पाटील नाराज असल्याच्या बातम्यासमोर आल्यानंतर त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

आमदार किशोर पाटील म्हणाले की, मला अजून सूत्र कळाले नाही. हे सूत्र कुठून येते? मी कधीही नाराज नव्हतो. मी स्वत:ला मुख्यमंत्री समजतो, हे मंत्री काय करता? निश्चित मी मंत्रिपदाच्या शर्यतीत आहे. परंतु माझी नाराजी नव्हती. आजही नाही आणि उद्याही राहणार नाही. संधी मिळाली तर नक्कीच त्याचं सोने करेन. मला जो विभाग मिळेल त्यामाध्यमातून राज्याच्या हिताचे निर्णय घेईन पण मी नाराज नाही एवढं नक्की असा खुलासा त्यांनी केला. 

तसेच अंधेरी पोटनिवडणुकीबाबत भारतीय जनता पार्टीने उमेदवार मागे घेण्याचा जो निर्णय घेतला तो अतिशय चांगला आहे. एखाद्या घरातील आमदार दगावला असेल तर त्याच्या पत्नीला उमेदवारी दिली असेल तर ही महाराष्ट्राची परंपरा आहे. भाजपाने माघार घेतल्याने अतिशय चांगला निर्णय घेतला असून मी त्यांचे मनापासून कौतुक करतो असंही आमदार किशोर पाटील यांनी म्हटलं. 

मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवरशिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन ३ महिने उलटले तरी दुसरा विस्तार पार पडला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांमध्ये नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दिवाळीआधी विस्तार होईल असं मानलं जात होते. परंतु अद्याप त्याला मुहुर्त मिळाला नाही. मात्र पक्षातील अस्वस्थता दूर करण्यासाठी काही आमदारांना महामंडळावर संधी दिली जाण्याची शक्यता आहे. या नाराजांना शांत करण्यासाठी सरकारने पाऊलं उचलण्यास सुरुवात केली असल्याचं दिसून येते. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार