शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

त्या कागदावर माझी झोपेतच सही घेतली; मनोज जरांगेंचा अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 18:53 IST

जरांगे पाटील यांनी शासनाच्या शिष्टमंडळावर गंभीर आरोप केले आहेत.

Manoj Jarange Patil ( Marathi News ) :मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकारमध्ये सुरू असलेल्या चर्चेतून अद्याप तोडगा निघाला नसून जरांगे यांच्या नेतृत्वाखालील मराठा आंदोलनाचं वादळ आता राजधानी मुंबईत धडकणार,  हे जवळपास निश्चित झालं आहे. सरकारकडून सातत्याने शिष्टमंडळ पाठवत जरांगे पाटील यांच्या मागण्यांबाबत समाधान करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र सरकारने दिलेले वविध प्रस्ताव जरांगे पाटलांकडून धुडकावून लावण्यात आले आहेत. अशातच आज जरांगे पाटील यांनी शासनाच्या शिष्टमंडळावर गंभीर आरोप केले आहेत. "आज सकाळी मी लोणावळ्यात पोहोचल्यानंतर काही सरकारी अधिकारी आले आणि झोपेच्या नादात एका कागदावर माझी सही घेतली. हा कागद कोर्टाचा असल्याचं त्यांनी मला सांगितलं होतं. पण माझ्या सहीचा दुरुपयोग केला तर गाठ माझ्याशी आहे," असा आक्रमक इशारा जरांगे यांनी सरकारला दिला आहे.

सकाळी झालेल्या घडामोडींबद्दल बोलताना मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे की, "सकाळी अधिकारी आला आणि मला कोर्टाचा कागद असल्याचं सांगत त्याने माझी सही घेतली. आम्ही कोर्टाचा सन्मान करतो, त्यामुळे मी लगेच सही केली. त्यामध्ये जे दोन कागद होते, त्यातील एका कागदावर मराठीतून मजकूर होता, तर दुसऱ्या कागदावर इंग्रजी मजकूर होता. मी गडबडीत त्यावर सही केली," असा दावा जरांगेंनी केला आहे.

"आता माघार नाही"

मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात आंदोलक येणार आहेत. आझाद मैदानावर एवढी मोठी क्षमता नाही तर बाकीच्या मैदानावर अन्य नियोजित कार्यक्रम आहेत, त्यामुळे मुंबईत या मोर्चाला परवानगी दिलेली नाही, असं मुंबई पोलिसांनी सांगितले आहे. मात्र काहीही झालं तरी आम्ही मुंबईला जाणारच, अशी भूमिका जरांगे पाटलांनी घेतली आहे.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणEknath Shindeएकनाथ शिंदे