शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 06:16 IST

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहातील चर्चेला उत्तर दिल्यानंतर त्यावर बोलण्यासाठी आग्रही असलेले भास्कर जाधव यांनी जी विधाने केली, त्याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे, असा आग्रह शंभूराज देसाई यांनी धरला

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विधानसभेतील अभ्यासू सदस्य, उद्धवसेनेचे भास्कर जाधव यांनी सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांसाठी शुक्रवारी सभागृहात माफी मागितली. कालच्या या विधानांबद्दलचा मुद्दा मंत्री शंभूराज देसाई यांनी सभागृहात उपस्थित केला. 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहातील चर्चेला उत्तर दिल्यानंतर त्यावर बोलण्यासाठी आग्रही असलेले भास्कर जाधव यांनी जी विधाने केली, त्याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे, असा आग्रह शंभूराज देसाई यांनी धरला. शिवाय, आदित्य ठाकरे यांची विधाने आणि वर्तनावरही त्यांनी टीका केली. अश्लील हातवारे करणे, बसल्याजागी टोमणे मारणे, असे प्रकार घडले. अध्यक्षांबद्दल सभागृहात आणि बाहेरही जी टिप्पणी केली, ती अध्यक्षांचा अवमान करणारी होती, असे देसाई म्हणाले.  दोघांनी माफी मागावी किंवा अध्यक्षांनी निलंबित करावे, अशी मागणी केली. 

शिक्षण मंत्री दादा भुसे म्हणाले, ज्यांचे दुधाचे दातही अजून गेले नाहीत, तेही आवेशाने बोलू लागले आहेत.  सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार म्हणाले, भास्कर जाधव  यांच्याकडून आक्रस्ताळेपणाची अपेक्षा नाही.  तसेच ज्यांचे वडील मुख्यमंत्री होते, ते बसून बोलतात, टोमणे मारतात, हे योग्य नाही. सभागृहात असे जे घडते, त्याचे पडसाद बाहेर उमटू शकतात आणि त्याचा स्फोटही होऊ शकतो, असेही ते म्हणाले. 

असा प्रमाद माझ्या हातून घडायला नको होतामी बाहेर मीडियासमोर जे बोललो, ते मी रात्री घरी जाऊन बघितले. मी तसे बोलायला नको होते. मी नियमांचा आग्रह धरणारा सदस्य असताना असा प्रमाद माझ्या हातून घडायला नको होता, हे मी मान्य करतो. त्यासाठी अध्यक्ष करतील ती शिक्षा मला मान्य असेल, असे भास्कर जाधव यावेळी म्हणाले.

सभागृहातील आपले आजवरचे वर्तन नियमांना सोडून कधीही नव्हते. मी कधीही असंसदीय शब्द वापरला नाही, माफीचा प्रसंग माझ्यावर आला नाही. कालही मला बोलू द्या, असाच माझा आग्रह होता, असे ते म्हणाले. सभागृहाबाहेरील विधानांसाठी माफी मागितली, तशी सभागृहातील विधानांसाठीही मागा, अशी मागणी  सत्तारूढ सदस्य, मंत्र्यांनी यावेळी केली. ती मान्य करत जाधव यांनी माफी मागितली. असे बोलताना ते भावुक झाले. 

टॅग्स :Bhaskar Jadhavभास्कर जाधवvidhan sabhaविधानसभाShiv Senaशिवसेना