शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
5
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
6
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
7
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
8
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
9
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
10
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
11
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
12
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
13
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
14
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
15
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
16
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
17
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
18
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
19
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्रला मीच मोठे केले

By admin | Updated: December 20, 2014 02:12 IST

राज्याचा विरोधी पक्षनेता असताना देवेंद्र फडणवीस यांना मीच सक्रीय केले. विदेशात सोबत नेऊन भाषणे करण्याची संधी दिली,

नागपूर : राज्याचा विरोधी पक्षनेता असताना देवेंद्र फडणवीस यांना मीच सक्रीय केले. विदेशात सोबत नेऊन भाषणे करण्याची संधी दिली, माझ्याकडील कागदपत्रे सभागृहात विषय मांडण्याकरिता दिली. कार्यकर्त्याला मोठे केलेले मला आवडते. देवेंद्रलाही हा नाथाभाऊ स्पर्धक वाटत नसेल, अशा शब्दांत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आपल्या भावना पत्रकारांकडे व्यक्त केल्या.माझ्यात काही त्रुटी असल्याने नेतृत्व करण्याची संधी पक्षाने मला दिली नसेल. त्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मात्र आता मला कशाचीही अपेक्षा नाही. मला जे मिळाले आहे त्यामध्ये मी खूष आहे, असेही खडसे म्हणाले.आपल्या विरोधात वरचेवर येणाऱ्या बातम्यांमागे कुणी पक्षांतर्गत विरोधक आहे का, असे विचारले असता खडसे म्हणाले की, मी कधीच कुणाला टार्गेट केलेले नाही. त्यामुळे मला पक्षातील कुणी लक्ष्य करील असे वाटत नाही. फडणवीस यांनी सक्रिय व्हावे याकरिता त्यांना मदत केली. विदेशात जाताना सोबत घेऊन गेलो. तेथे इंग्रजीत भाषणे करण्याची संधी दिली. मी मुख्यमंत्री नसलो तरी या नाथाभाऊचे स्थान महाराष्ट्र व दिल्लीतही वरचे राहिले आहे. देवेंद्र यांना पक्षाचे अध्यक्ष करायचे होते तेव्हा दिल्लीतील वरिष्ठांनी सांगितले की, खडसेंचा फोन आल्याखेरीज देवेंद्र यांच्या नावाची घोषणा होणार नाही. पक्षश्रेष्ठींनी ही भूमिका घेतल्याने गोपीनाथ मुंडे हेही काहीसे अस्वस्थ झाले होते. पक्षाने आतापर्यंत तीनवेळा मला प्रदेशाध्यक्ष होण्याबाबत विचारले होते. नितीन गडकरी अध्यक्ष झाले तेव्हा लालकृष्ण अडवाणी जळगावमध्ये येऊन माझ्या नावाची घोषणा करणार होते. तेवढ्यात गडकरी यांनी मला दूरध्वनी केला आणि म्हणाले की, तुमच्याकरिता बायको बघायला गेलो होतो पण मीच लग्न करून टाकले.सुधीर मुनगंटीवार प्रदेशाध्यक्ष होण्याची वेळ आली तेव्हाही मला विचारणा केली होती. मात्र मी नकार दिल्यावर तुम्हाला विरोधी पक्षनेत्याचा लाल दिवा सोडवत नाही का? असा सवाल दिल्लीत केला गेला. परंतु तब्येतीच्या कारणास्तव आपण अध्यक्षपद घेतले नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या निवडीचा विषय आल्यावर पुन्हा पक्षाकडून विचारणा झाली. गोपीनाथ मुंडे यांना मी स्पष्ट सांगितले की, मी तुमचा समर्थक आहे तुम्ही सांगाल त्याला माझा पाठिंबा राहील. एक दिवस मुंडे देवेंद्र यांना सोबत घेऊन आले व त्यांनी तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांना दूरध्वनी लावून दिला. देवेंद्र यांच्या नावावर एकमत झाल्याचे मला सांगण्यास सांगितले, असेही खडसे म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)