शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

मी चॅलेंज देऊन सांगतो अजितदादा मुख्यमंत्री होणार नाहीत : संभाजीराजे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 07:16 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट महायुतीत सामील झाल्याने संभाजीराजे यांनी भाजपला लक्ष्य केले.

मुंबई : अनेक लोक म्हणतात की, एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रिपद जाणार आणि अजितदादा मुख्यमंत्री होणार; पण मी चॅलेंज देऊन सांगतो की, अजितदादा मुख्यमंत्री होणार नाहीत, असे माजी खासदार स्वराज्य संघटनेचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे.संभाजीराजे यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य पक्षाचा प्रथम वर्धापन दिन मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी संभाजीराजे यांनी आपल्या भाषणात प्रामुख्याने भाजपाला लक्ष्य केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट महायुतीत सामील झाल्याने संभाजीराजे यांनी भाजपला लक्ष्य केले. ज्यांना तुरुंगात टाकण्याची भाषा करत होते, त्यांनाच आता सोबत घेतले आहे. राज्यातील जनतेची अशा युतीने मती गुंग झाली आहे; पण हे तीन पक्ष भविष्यात एकत्र राहणार नाहीत. हे पक्ष लोकसभेपुरते एकत्र आले आहेत. कदाचित लोकसभा निवडणूक संपल्यानंतर अजित पवार गट पुन्हा शरद पवार गटात सामील होईल, असे भाकीतही त्यांनी केले. या राजकीय परिस्थितीच्या विरोधात स्वराज्य पक्ष लढा देईल, असेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे नऊ मंत्री पुन्हा पवारांसोबत जाणारराष्ट्रवादी काँग्रेसचे जे नऊ मंत्री भाजपसोबत आले आहेत. ते ज्येष्ठ नेते आहेत. ते परत एकदा मोठ्या साहेबांसोबत म्हणजे शरद पवारांसोबत जाणार असल्याचा दावाही संभाजीराजे यांनी केला आहे.

मराठा आरक्षण, शिवस्मारकाचे काय झाले? भाजपाने मराठा समाजाला मराठा आरक्षण, अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचे आश्वासन दिले होते. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर भाजप गप्प आहे, तर शिवस्मारकाचे जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून नऊ वर्षे झाली तरी अजून हे स्मारक का होत नाही? असा सवाल माजी खासदार संभाजीराजे यांनी केला.

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीAjit Pawarअजित पवार