शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

'महाराष्ट्राला भिकारी म्हणणाऱ्याला मी महाराष्ट्रातून हद्दपार करते'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2019 16:00 IST

एक धरण फुटलं होतं, तेव्हा महाराष्ट्रातील एका मंत्र्यानं उत्तर दिलं की ते खेकड्यानं फोडलं होतं.

उस्मानाबाद - मी दिल्लीत काम करते, मी विरोधकांवर जास्त बोलत नाही. महाराष्ट्रात सगळं दादा बघतो, राहुल बघतात. कधीतरी कुणी नारळ फोडायला बोलवतं, ते भाग्यच माझं. मला माहितही नव्हत भूम-परंडा-वाशी मतदारसंघातून राहुल मोटेंविरुद्ध कोण उभा आहे. मला, इथं आल्यावरच समजलं, असे म्हणत सुप्रिया सुळेंनी जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांना अधिक महत्त्व नसल्याचं दाखवून दिलंय. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांच्या संयुक्त पुरोगामी आघाडीचे वाशी-भूम -परांडा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राहुल मोटे यांच्या प्रचारार्थ खासदार सुप्रियाताई सुळे यांनी वाशी येथे सभा घेतली.

एक धरण फुटलं होतं, तेव्हा महाराष्ट्रातील एका मंत्र्यानं उत्तर दिलं की ते खेकड्यानं फोडलं होतं. मला तेव्हा दिल्लीतून काहींचे फोन आले, तुमच्या महाराष्ट्रात खेकड्यानं धरण फोडलं असं मत्रीमहोदय सांगत असल्याची विचारणा झाली. तेव्हा ते हसायला लागले, मी दम देऊन माझ्या महाराष्ट्राला हसायचं नाही, असं बजावलं. मी खेकडा खाते, आपण खेकड्याला खातो, तो कशाला आपल्याला खाईल. खेकडा कशाला धरण फोडेल, असे म्हणत तानाजी सावंत यांच्यावर टीका केली. तसेच, महाराष्ट्राला भिकेला लावेल, असं वक्तव्य सावंत यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्त्व्याचाही सुप्रिया यांनी समाचार घेतला. महाराष्ट्रात, देशात, जगात कुठेही... माझ्या महाराष्ट्राला भिकारी म्हणणारा माणूस मला चालणार नाही, असे म्हणत सावंत यांना लक्ष्य केलं. माझ्या महाराष्ट्राचा मला अभिमान आहे. माझ्या महाराष्ट्राला वाकडं नजरेनं जरी पाहिलं तर गाठ सुप्रिया सुळेंशी आहे. महाराष्ट्राला भिकारी म्हणाऱ्याला तुम्ही मतदारसंघातून हद्दपार करा, मी महाराष्ट्रातून हद्दपार करते, असा शब्द देते तुम्हाला असे म्हणत तानाजी सावंत यांना सुप्रिया सुळेंनी इशाराच दिला आहे. 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेTanaji Sawantतानाजी सावंतAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019