शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Eknath Shinde : "मला निवडून यायला कोणत्याही निशाणीची गरज नाही कारण..."; एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 11:16 IST

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठं विधान केलं आहे. "निवडून येण्यासाठी मला चिन्हाची गरज नाही" असं म्हटलं आहे. 

एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेला लागलेली गळती थांबताना दिसत नाही. राज्यभरातून शिंदे गटाला पाठिंबा वाढत आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांचीही ताकद वाढताना दिसत आहे. दुसरीकडे पडलेल्या भगदाडातून पक्षाला सावरण्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे प्रचंड सक्रीय झाले आहेत. याच दरम्यान आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठं विधान केलं आहे. "निवडून येण्यासाठी मला चिन्हाची गरज नाही" असं म्हटलं आहे. 

"माझ्यावर काही लोकं आरोप लावतात... एकनाथ शिंदेने हे पाप केलं, पण मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की, मला निवडून यायला कोणत्याही निशाणीची गरज लागत नाही, एवढं काम मी माझ्या मतदार संघात करून ठेवलं आहे" असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. सासवडमधील सभेत शिंदेंनी त्यांच्यावर सातत्याने होणाऱ्या टीकेला हे उत्तर दिलं आहे. शिवसेनेतील बंडखोर आमदार, माजी मंत्री उदय सामंत यांच्या मोटारीवर शिवसैनिकांनी मंगळवारी रात्री कात्रज चौकात हल्ला केला. या दगडफेकीत सामंत यांच्या मोटारीची काच फुटली. घडलेल्या प्रकारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. 

"गाडीवर दगड मारून पळून जाणे ही मर्दुमकी नाही. कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम पोलिसांचे आहे. ते पोलीस करतील. ज्यांनी भ्याड हल्ला केला, त्यांच्यावर पोलीस कायदेशीर कारवाई करतील. याबाबत मी पोलिसांशी बोलतो. कायदा सुव्यवस्था राखणे हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे", असे ते म्हणाले. उदय सामंत यांची गाडी सिग्नलला थांबली होती. ती पाहिल्यावर शिवसैनिकांनी गद्दार गद्दार म्हणत गाडीवर चपला, दगड, बाटल्या फेकल्या. त्यात गाडीची काच फुटली. हा प्रकार पाहताच पोलीस तातडीने सामंत यांच्या मोटारीला वाट करुन दिली. 

उदय सामंत म्हणाले, "माझ्या गाडीवर झालेला हा भ्याड हल्ला आहे, गाडी सिग्नलला थांबली असताना २० ते २५ जणांनी माझ्या गाडीवर हल्ला केला. त्यांच्या हातात दगड व बेसबॉल स्टिक्स होत्या. हा हल्ला म्हणजे पुर्वनियोजित षडयंत्र आहे. मला आदित्य साहेबांची सभा आहे याची कल्पना नाही. माझी गाडी केवळ सिग्नलला थांबली होती. त्यावेळी ठरवून हा हल्ला झाला. मी कोणत्याही धमक्यांना घाबरत नाही.याबाबत मी मुख्यमंत्री महोदय यांच्या कानावर घातले आहे, माझ्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात पोलिसांनी कारवाई करावी", अशी मागणी उदय सामंत यांनी केली.

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण