शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री पद अन् महाविकास आघाडीत मतभेद; शरद पवार म्हणतात, माझ्याकडे माहिती नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 14:00 IST

मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेवर आज पत्रकारांनी शरद पवारांना प्रश्न विचारला होता.

मुंबई - राज्यात सध्या मुख्यमंत्रिपदावरून बरीच चर्चा आहे. ही चर्चा होण्यामागचं कारण म्हणजे अजित पवार भाजपात जाणार, अजित पवार मुख्यमंत्री होणार अशा वावड्या उठल्या. त्यानंतर खुद्द अजित पवारांनीही एका मुलाखतीत मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल. २०२४ ला काय, आताही राष्ट्रवादीचा मुख्यमंत्रिपदावर दावा आहे असं विधान त्यांनी केले. त्यानंतर ठिकठिकाणी अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले. 

मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेवर आज पत्रकारांनी शरद पवारांना प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले की, मुख्यमंत्री बदलाबाबत मला काही माहिती नाही. मुख्यमंत्री बदलायचा असेल तर आम्हाला कुणी सांगायचे कारण नाही. असं काही असेल तर ते माझ्या कानावर नाही. संजय राऊतांचे विधान असले तरी ते पत्रकारही आहेत. पत्रकारांना अधिक माहिती असते म्हणून ती त्यांच्याकडे असेल असं त्यांनी सांगितले. त्याचसोबत भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावलेत त्यांनी असा वेडेपणा करू नका असं अजित पवारांनीच प्रतिक्रिया दिल्याचे शरद पवार म्हणाले. 

ठाकरेंनी दिलाय का मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव?महाविकास आघाडी टिकावी यासाठी उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीला घ्या असा प्रस्ताव दिल्याची बातमी माध्यमांमध्ये छापून आली. परंतु यावर मुख्यमंत्रिपदाबाबत माझी उद्धव ठाकरेंशी चर्चा नाही. ठाकरेंनी मला प्रस्ताव दिला अशी बातमी कुणीतरी अशीच तयार केली आहे. त्याला माझ्यादृष्टीने काही महत्त्व नाही असा खुलासा पवारांनी केला आहे.

मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा होईलअजित पवारांनी प्रथमच मुख्यमंत्रीपदाबाबत इच्छा व्यक्त केली नाही. त्यामुळे अजित पवारांना माझ्या शुभेच्छा आहेत. मुख्यमंत्री होण्यास कोणाला आवडणार नाही. अजित पवारांमध्ये मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे. ते अनेक वर्षापासून राजकारणात असून, मंत्रीही होते. सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम अजित पवारांनी केला आहे. त्यामुळे प्रत्येकाला वाटते आपण मुख्यमंत्री व्हावे. पुढील मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होईल असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. 

ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्रीमहाविकास आघाडी व्हावी हा आमचा प्रयत्न आहे. महाविकास आघाडीत ज्याच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री होईल. तसेच काही कारणांनी महाविकास आघाडी झाली नाही तर आमच्याकडे सगळे प्लॅन तयार आहेत, अशी स्पष्ट भूमिका मांडत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी मांडली आहे. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडी