शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

आईकडे जायची हिंमत नाही; भावासाठी फुटला अश्रूबांध; फोटो आल्यानंतर धनंजय देशमुख धाय मोकलून रडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 10:21 IST

‘आई रोज पाहतेय... तिच्याकडे जायची हिंमत होत नाहीये...’ असे म्हणत धनंजय देशमुख यांनी भावनांना वाट मोकळी केली.

लोकमत न्यूज नेटवर्क, बीड/केज : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे आणि अंगावर शहारे आणणारे काही कथित फोटो सोमवारी व्हायरल झाले. त्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी सकाळी मस्साजोगला देशमुख कुटुंबाची भेट घेतली.

यावेळी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय यांना जरांगे पाटील पाहताच अश्रू अनावर झाले. गळ्यात पडून ते धायमोकलून रडले. ‘आई रोज पाहतेय... तिच्याकडे जायची हिंमत होत नाहीये...’ असे म्हणत त्यांनी भावनांना वाट मोकळी केली. आरोपींना फाशीच व्हावी, तेव्हाच न्याय मिळेल, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

‘...तर माझ्या भावाचा जीव वाचला असता’  

आरोपीविरुद्ध गंभीर गुन्हे असतानाही ते राजरोस पोलिसांसोबत फिरत होते. वेळीच त्यांच्या मुसक्या आवळल्या असत्या, तर ही घटना घडतच नव्हती. माझ्या भावाचा जीव वाचला असता. पोलिसांच्या हयगयीमुळेच ही घटना घडली असून, त्यांनाही शिक्षा व्हावी, अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे. 

सरपंच हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंवर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात येऊन त्यांची आमदारकीसुद्धा रद्द करावी. पुरवणी तपास करण्यात यावा व यात धनंजय मुंडेंना सहआरोपी करावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. घटनेत पोलिस यंत्रणा, प्रशासन दोषी आहे, असे खासदार बजरंग सोनवणे म्हणाले.  

केजमध्ये टायर जाळले

सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करतानाचे फोटो  व्हायरल झाल्यानंतर क्रूरतेच्या निषेधार्थ आणि आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी मंगळवारी जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. परळी वगळता सर्वच १० तालुक्यांत बंद पाळण्यात आला. 

केजमध्ये टायर जाळण्यात आले.  बीडमध्ये रॅली काढत बंदचे आवाहन केले. केज शहरातील धारूरकडे जाणाऱ्या चौकात काही लोक एकत्र आले. धनंजय मुंडे, वाल्मीक कराड आणि विष्णू चाटे यांचे फाेटो असलेले बॅनर आणि टायर जाळण्यात आले.   

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणSantosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील