शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
6
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
7
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
8
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
9
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
10
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
11
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
12
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
13
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
14
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
15
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
16
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
17
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
18
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
19
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
20
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण

राजन साळवींना मी फोन केला नाही,  त्यांचाच आला, वैभवलाही...; रामदास कदमांचे सुतोवाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 15:50 IST

कुडाळ-मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी साळवींनी ठाकरे शिवसेना का सोडली ते सांगितले. तसेच शरद पवारांसोबतच्या आघाडीवरून देखील खडेबोल सुनावले आहेत.

राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटाचा हात पकडल्याने कोकण पट्ट्यात ठाकरे गटात खळबळ उडाली आहे. तिकडे कुडाळ-मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी साळवींनी ठाकरे शिवसेना का सोडली ते सांगितले. तसेच शरद पवारांसोबतच्या आघाडीवरून देखील खडेबोल सुनावले आहेत. अशातच शिंदे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी सूचक वक्तव्य केले आहे. 

राजन यांनी योग्य वेळेला योग्य निर्णय घेतला आहे, उद्धव ठाकरेंना मी शेवटपर्यंत साथ देण्याचा प्रयत्न केला. पण आज त्यांच्याकडे सगळे संपलेले आहे, हे त्यांनी महाराष्ट्राला दाखवून दिले. काल मला त्याचा फोन आला होता. आम्ही जेव्हा निर्णय घेतला तेव्हा आमच्यासोबत या म्हणून फोन केला नव्हता. त्यावेळी बोललो असतो तर बदल झाला असता. पण काल भाई मी तुमच्यासोबत येतोय, माझ्यावर लक्ष ठेवा, असे सांगायला फोन केलेला. मी त्याला काही काळजी करू नको असे सांगितले आहे. एवढेच नाही तर वैभव नाईक आणि माझेही संबंध जवळचे आहेत, पण मी त्याला आतापर्यंत कधीही फोन केला नाही, असे सुतोवाच रामदास कदम यांनी दिले आहेत. 

वैभव नाईक यांनी साळवींच्या पक्षप्रवेशावर बोलताना आपण ठाकरे गटातच राहून शिवसेना वाढविणार असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतू, रामदास कदमांच्या या वक्तव्याने राजकीय आडाखे बांधण्यास सुरुवात झाली आहे. 

उद्धव ठाकरेंसोबत कोणीच शिल्लक राहणार नाही हे मी आधीच सांगितले होते. राजन साळवींचा पक्षप्रवेश म्हणजे उद्धव ठाकरेंच्या सणसणीत राजकीय चपराक लावली आहे. अजून पुष्कळ लोक प्रवेशासाठी रांगेत उभे आहेत. हम दो हमारे दो एवढेच शिल्लक राहणार मातोश्रीकडे, असा इशाराही कदम यांनी दिला. 

कधी कधी सत्य हे पचत नसते, तशी अवस्था संजय राऊत आणि विनायक राऊत यांची झाली आहे. जे वास्तव आहे ते शरद पवार बोलले. वास्तव नसते तर शिंदे यांना हा दिवस मिळाला नसता. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांचे वैचारिक मतभेद नव्हते. शरद पवारांचा अभ्यास दांडगा आहे, प्रचंड आहे.  आपण कोणावर काय बोलतो याचं भान संजय राऊत यांनी ठेवलं पाहिजे, असा सल्ला कदम यांनी राऊतांना दिला आहे. 

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमVaibhav Naikवैभव नाईक Rajan Salviराजन साळवीShiv Senaशिवसेना