शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

मी बारामतीला आईला भेटायला येतो, पण फोटो काढत नाही, अजित पवारांचा नरेंद्र मोदींना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2022 14:27 IST

Ajit Pawar Criticize PM Narendra Modi: आईला भेटायला आल्यावर या भेटीचे फोटो काढण्यावरून अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. मीसुद्धा बारामतीला आईला भेटायला येतो, मात्र फोटो काढत नाहीस असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे. 

बारामती - बारामतीच्या दौऱ्यावर असलेले विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव न घेता त्यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. आईला भेटायला आल्यावर या भेटीचे फोटो काढण्यावरून अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे.  मीसुद्धा बारामतीला आईला भेटायला येतो, मात्र फोटो काढत नाहीस असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे. 

अजित पवार एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करतान म्हणाले की, मला काठेवाडीवरून मुंबईला पाठवलं. गेलो ना तिथे. राहतोय ना तिथे. कधी म्हटलंय का मला राहायचं आहे. मला राहायचं आहे. मीसुद्धा आईला भेटायला येतो पण फोटो काढत नाही. भेट घेतो आणि जातो. आताही ही सभा संपल्यावर आईला भेटायला जाणार आहे, असे अजित पवार म्हणाले.

राज्य सरकारने केलेल्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवरही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीका केली. त्यांचा रोख उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या सहा जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाकडे होता. एक जिल्हा सांभाळताना मला नाकी नऊ येत होते. सहा सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद घेणारे काम कसं करणार? तरीही देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा, अशा खोचक शब्दात अजित पवार यांनी टोला लगावला.

यावेळी बारामतीमधील सहकारी संस्थ्यांच्या पदाधिकाऱ्यांना अजित पवार यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, जी जबाबदारी जनता आपल्यावर देईल. आपले वरिष्ठ आपल्यावर देतील. आपले सहकारी आपल्यावर देतील. आपले सभासद आपल्यावर देतील. त्यापद्धतीनं तुम्हाला मला वागावच लागेल, असे ते म्हणाले.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNarendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस