शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 10:00 IST

सुनांच्या हातात कारभार गेला की सासूला फक्त आणायचे सांगतात. वाटायला या सुना असतात, अशी टोलेबाजी करीत महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांना मनमुराद हसवले.

लोकमत न्यूज नेटवर्क  जालना : केंद्राकडून निधी आणला तरी बांधकाम विभाग, सिंचन खाते राज्याचे आहे. महावितरण राज्याचे आहे. राज्य सरकार आमची एजन्सी आहे. पैसे आणणे माझे काम आहे. मी राजकारणातील सासू आहे. अर्जुनराव (अर्जुन खोतकर) आणि अरविंदराव (अरविंद चव्हाण) माझ्या सुना आहेत. एकदा का सुनांच्या हातात कारभार गेला की सासूला फक्त आणायचे सांगतात. वाटायला या सुना असतात, अशी टोलेबाजी करीत महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांना मनमुराद हसवले. गोलापांगरी (ता. जालना) येथील सभेत ते बोलत होते. 

‘...तर मला आमदार करा’केंद्रातून निधी आणला तरी तुम्ही आमचे काही केले नाही, असे कार्यकर्ते सांगतात. हाच धागा पकडून दानवे यांनी मिश्कील टोलेबाजी केली.  ते म्हणाले की, तुम्ही माझी भूमिका समजून घ्या आणि वाटत असेल तर पुढच्या निवडणुकीत अर्जुनरावांना खासदार करा आणि मला तुमचा आमदार करा. मग मी तुमच्या गावा-गावात यायला तयार आहे. ही निवडणूक विकासावर जाऊ द्या.  

‘कोठे थांबायचेते कळते’ या सभेत माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी मतभेद असले तरी कोठे थांबायचे ते कळते असे सांगत, नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान आणि दानवे यांना कॅबिनेट मंत्री करण्यासाठी आपले प्रयत्न राहणार असल्याचे सांगितले.

‘तुम्ही आमचे बाप, आजे’  nकेंद्रात मंत्री कोण होतो. ज्याचा आजा (आजोबा) केंद्रात मंत्री होता. ज्याचा बाप केंद्रात मंत्री होता. nया दोन सुना असल्या तरी तुम्ही (जनता) आमचे बाप, आजे आहात.nतुम्ही ठरवा कोणाला प्रतिनिधी करायचे, असे सांगत दानवे यांनी मतदारांनी आपल्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले. 

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेjalna-pcजालनाmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४